कोरोना मृत्यूवर WHOचा मोठा खुलासा, दाखविण्यात येणाऱ्या आकड्यापेक्षा दुप्पट संख्या

जगात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मात्र, मृत्यूच्या आकड्याबाबतर WHOने मोठा खुलासा केला आहे. दाखविण्यात येणाऱ्या आकड्यापेक्षा दुप्पट संख्या असल्याचे WHOने म्हटले आहे.

Updated: May 22, 2021, 08:43 AM IST

Corona से मौतों पर बोला WHO: ‘बहुत कम बताए गए आंकड़े, वास्तविक संख्या दोगुनी से ज्यादा हो सकती है'

मुंबई : एक धक्कादायक वास्तव WHOने मांडले आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. जगात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मात्र, मृत्यूच्या आकड्याबाबतर WHOने मोठा खुलासा केला आहे. दाखविण्यात येणाऱ्या आकड्यापेक्षा दुप्पट संख्या असल्याचे WHOने म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी आतापर्यंत उघडकीस आली आहे, वास्तविक जे दाखविण्यात येत आहे, त्यापेक्षा चित्र जास्त भयानक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी म्हटले आहे की कोविड-19 मध्ये 2020 मध्ये जगभरात किमान 30 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, मृतांच्या अधिकृत संख्येच्या दुप्पट. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की कोरोना विषाणूमुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे जीव गमावलेल्या लोकांची संख्या खूप कमी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

गेल्यावर्षी इतके संक्रमित

आमची सहकारी वेबसाइट WIONमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, WHOच्या सहायक महासंचालक  समीरा अस्मा (Samira Asma)म्हणाल्या की, जगभरातील मृत्यूची संख्या नोंदविलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या जागतिक आरोग्य सांख्यिकी अहवालात म्हटले आहे की 31 डिसेंबर 2020 पर्यंत जगभरात 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती आणि 18 लाखाहून अधिक लोक मरण पावले होते, परंतु प्राथमिक अंदाजानुसार ही संख्या खूप जास्त आहे.

मूळ संख्या 12 लाखपेक्षा अधिक

WHOने म्हटले आहे की 2020मध्ये COVID-19मध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कमीतकमी  30 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले आहे, जे देशांद्वारे अधिकृत केलेल्या आकड्यांपेक्षा सुमारे 12 लाख जास्त आहे. अहवालानुसार कोरोना मृतांची ताजी संख्या संस्थेला 33 लाख देण्यात आली आहे. तर 2020च्या अंदाजानुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मृत्यूची संख्या कमी केली गेली आहे.

Tedros Adhanom यांचा इशारा

त्याचवेळी, डब्ल्यूएचओचे प्रमुख  Tedros Adhanom यांनी जगातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली की जोपर्यंत लसींमध्ये जागतिक असमानता आहे, तोपर्यंत लोक कोरोनाचे बळी ठरणार आहेत. ते म्हणाले की, लसीकरणाचा वेग वाढण्याबरोबरच ही लस सर्व देशांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.  WHO जागतिक आरोग्य साथीच्या दरम्यान ही संस्था पुढच्या आठवड्यात 74 व्या जागतिक आरोग्य परिषदेचे आयोजन करण्याची तयारी करत आहे.