राहुल गांधी यांना भेटल्यावर 'ती' नेपाळची प्रसिद्ध गायिका म्हणाली...

काठमांडू येथील एका पबमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, याच क्लबमध्ये उपस्थित एका नेपाळी गायिकेने राहुल गांधी यांना...  

Updated: May 5, 2022, 03:28 PM IST
राहुल गांधी यांना भेटल्यावर 'ती' नेपाळची प्रसिद्ध गायिका म्हणाली... title=

काठमांडू : काँगेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना काठमांडू ( Kathamandu ) येथील पबमध्ये हजेरी लावली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती.

एकीकडे राहुल गांधी यांच्यावर टीका होत असताना दुसरीकडे एका प्रसिद्ध नेपाळी गायिका हिने ट्विटरवर एका काँग्रेस नेत्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या नेत्याला भेटल्याचा अनुभव त्यांना शेअर केला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर राजकीय गोंधळाच्या दरम्यान हे घडले आहे ज्यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसले होते.

सुमनीमा उदास ( Sumniya udas ) यांच्या लग्नाला ही गायिका उपस्थित होती. या लग्न सोहळ्यात त्यांनी काही गाणी गायली. "सर्व लोकांना एकत्र आणण्याची ताकद संगीतामध्ये आहे.

काल संध्याकाळी मला भारतीय संसदेचे सदस्य राहुल गांधीजी यांच्यासाठी काही गाणी गाण्याचा मान मिळाला. ते खूपच नम्र आणि साधे व्यक्ती वाटले. ही संधी दिल्याबद्दल सुमनीमा यांचे खास आभार'

नेपाळच्या या प्रसिद्ध गायिका आहेत ( Saraswati Khatri ) सरस्वती खत्री.. त्यांनीच बुधवारी संध्याकाळी हे ट्विट केले आहे. 

 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून राजकीय गोंधळाच्या दरम्यान हे घडले आहे ज्यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसले होते.

दरम्यान, भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी "जे भारताच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान देत आहेत त्यांच्याशीच तुमचे संबंध का आहेत"? असा सवाल राहुल गांधी यांना केलाय.

"सुमनिया उदास हे नेपाळी मुत्सद्दी आहेत. उत्तराखंड येथील काही प्रदेशावर नेपाळ आपला दावा सांगत आहे. त्याचे सुमनिया उदास हे समर्थन करता. चीनपासून नेपाळपर्यंत जे भारताच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान देत आहेत. त्यांच्याशीच राहुल गांधी यांचे संबंध का आहेत?" असे ट्विट मालवीय यांनी केले आहे.