Girl Flighting Video: विमानात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण ऐकूण थक्क व्हाल

Women Fighting Viral Video : महिलाचं भांडणं पाहण्याची मजाच वेगळी असते. मग ती नळावरची भांडणं असो किंवा बसमधली. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये दोन महिला विमानात भांडताना दिसत आहेतच.

Updated: Feb 8, 2023, 07:16 PM IST
Girl Flighting Video: विमानात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण ऐकूण थक्क व्हाल title=
Passenger Fight Viral Video

Girl Fighting Viral Video: सोशल मीडियावर (Social Media Viral Video) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून अनेकांचं मनोरंजन होतं. तर काही व्हिडिओ विचार करण्यास भाग पाडतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Trending Video) व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू देखील आवरणार नाही. एका विमानातील हा व्हिडिओ असल्याचं पहायला मिळतंय. (Watch Viral Video Passenger Fighting in Flight over window seat kicked and punch Trending video)

संबंधित घटना ब्राझीलमधील (Brazil Flight Viral Video) विमानातील असल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार 2 फेब्रुवारी रोजी घडला होता. फ्लाइट क्रमांक G3-1659 चे टेकऑफ होण्यापूर्वीच फ्लाइट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना गोंधळ झाल्याची माहिती मिळालीये. ती महिला प्रवाशांसाठी नसून खिडकीची सीट होती. एक विंडो सीट रिकामी होती, त्यावेळी एक महिला आपल्या मुलाला घेऊन आली. 

आणखी वाचा - Viral Video : SHO चा महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स व्हायरल

दुसऱ्या महिलेला विंडो सीटसाठी विनंती केली तेव्हा तिने नकार दिला. ही गोष्ट कदाचित महिलेला खटकली आणि तिच्यात वाद झाला.  प्रकरण हळूहळू वाढत गेलं अन् दोघांमध्ये भांडण सुरू झाले. हा सर्व प्रकार पाहून महिलेचं कुटुंबीय तिथं बसलं होतं, त्यांनी त्या प्रवाशाची कॉलर पकडण्यास सुरुवात केली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्या व्यक्तीचे कुटुंबीयही विमानात बसले होते. त्यांनी लगेच मारामारीही सुरू केली. त्यानंतर जोरदार गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं.

पाहा Video - 

दरम्यान, महिला प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाची एअरलाईन्सकडून (Brazil Flight Video) तातडीनं दखल घेण्यात आली. भांडण करणाऱ्या सर्व प्रवाशांचा विमान प्रवास रद्द करण्यात आल्याची माहितीही समोर आलीय. प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एअरलाईन्सकडून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.