Video:हा कुत्रा नाही किंवा मांजर नाही; मग महिलेने कुठल्या प्राण्याला घेतलं मिठीत?

 सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.

Updated: Jul 31, 2022, 06:28 PM IST
Video:हा कुत्रा नाही किंवा मांजर नाही; मग महिलेने कुठल्या प्राण्याला घेतलं मिठीत? title=

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहून अनेक वेळा आपल्याला धक्का बसतो. ते व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. या व्हिडीओत एक विचित्र घटना कैद झाली आहे. काय आहे असं या व्हिडीओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात

कधी पाहिला नसेल असा व्हिडिओ 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एका प्राण्याला उचलून घेऊन येत आहे. तुम्हा वाटत असेल की, हा कुत्रा किंवा मांजर आहे. पण थांबा...हा प्राणी कुत्रा किंवा मांजरी नाही. तर हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी आहे. ज्याचा समोर ज्याला प्या महिलेने चक्क जंगलाचा राजा सिंहाला आपल्या मिठीत घेतलं आहे. 

शेर बना भीगी बिल्ली!

महिलेने सिंहाला असं का उचललं आहे, याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. मात्र तिच्या मिठीतील सिंहाची अवस्था बघू वाईट वाटतं. बिचारा सिंह तिच्या मिठीतून सुटण्यासाठी गर्जना करत आहे, मात्र त्या महिलेला काही फरक पडताना दिसत नाही. 16 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही अंतरावर असलेल्या कारजवळ ही महिला सिंहाला खाली उतरवते. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक यूजर्सचं डोक चक्रावतं. 

सोशल मीडियावर महिलेबद्दल नाराजी

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर 30 लाख यूजर्सने पाहिला आहे. तर अनेक यूजर्सने तो रीट्वीट केला आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सने महिलेच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर काही लोकं प्राण्यांचा अशा प्रकारची क्रूर वागणुकीबद्दल टीका करत आहेत. तर एक यूजरने सिंहाला होत असलेल्या वेदनेकडे लक्ष वेधलं आहे.