7.3 रिश्टर स्केलचा भूकंप नेमका दिसतो कसा? VIDEO पाहून अंगावर काटा येईल

ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील वानुआतु या बेटावर मंगळवारी 7.3 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला. अनेक सीसीटीव्ही, कॅमेऱ्यांमध्ये हा भूकंप कैद झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 17, 2024, 04:33 PM IST
7.3 रिश्टर स्केलचा भूकंप नेमका दिसतो कसा? VIDEO पाहून अंगावर काटा येईल title=

ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील वानुआतु या बेटावर मंगळवारी 7.3 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला, ज्यामुळे राजधानी पोर्ट विलामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:47 वाजता मुख्य बेट एफेटच्या किनाऱ्यापासून अंदाजे 30 किमी अंतरावर, 57 किमी खोलीवर भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे क्षण दाखवणारे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत.

एक्सवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे. यामध्ये भूकंप आल्यानंतर जंकयार्ड हादरताना दित आहे. यादरम्यान कॅमेऱ्यात एक कुत्रा पळताना दिसत आहे. तर दुसरीकडे एक माणूस जीव वाचवण्यासाठी बाहेर पळताना दिसत आहे. 

दुसऱ्या व्हिडिओमध्ये भूकंप किती विनाशकारी होता हे दिसत आहे. ज्यामध्ये यूएस, यूके आणि फ्रेंच दूतावासाच्या इमारतींचे लक्षणीय नुकसान झालं आहे.

एका फोटोत रस्त्याच्या मधोमध मुळापासून उखडून पडलेली झाडं दिसत आहेत.

अमेरिकन दूतावासाच्या पहिल्या मजल्याचे नुकसान झालं आहे. फुटेजमध्ये कोसळलेला दूतावासा दिसत आहे. या दुतावासात लोक अडकल्याचं सांगितलं जात आहे. 

दुपारच्या मोठ्या भूकंपानंतर पोर्ट विला येथील CARE इंटरनॅशनलच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं इतर व्हिडीओत दिसून आलं. शहरातील बऱ्याच मोठ्या इमारती कोसळल्या आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला आहे. पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे राजधानीचा बहुतांश भाग प्रभावित झाला आहे.