Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. हे व्हिडीओ कधी फक्त मनोरंजनाच्या हेतून तयार केलेले असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्या आजुबाजूला घडलेल्या घटनांचे असतात. हे व्हिडीओ काही वेळा अंगावर काटा आणणारे असतात. दरम्यान, नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका अजगराच्या (Python) पोटातून एक, दोन नव्हे तर तब्बल पाच फुटांची मगर (Alligator) बाहेर काढण्यात आली आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Newsweek च्या वृत्तानुसार, एव्हरग्लेड्स (Everglades) येथील नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांनी 18 फूट अजगर सापडला. अजगर सुजला असल्याने कर्मचारी त्याचं शवविच्छेदन करण्यासाटी घेऊन गेले. यावेळी त्यांनी अजगराचं पोट कापलं असता त्यामध्ये चक्क 5 फुटांची मगर होती. हे दृश्य पाहिल्यानंतर तिथे उपस्थित डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
बर्मी अजगरांना (Burmese pythons) एव्हरग्लेड्समध्ये आक्रमक मानले जाते. यावर्षी ऑगस्टमध्ये आयोजित 2022 Florida Python Challenge दरम्यान, शेकडो अजगरांना या भागातून काढून टाकण्यात आले.
भूवैज्ञानिक रोझी मूर यांनी इंस्टाग्रामला अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून ट्विटर, रेडिट अशा अनेक सोशल माध्यमांवर दिसत आहे.
या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओत सुरुवातील मृत अवस्थेतील अजगर दिसत आहे. यावेळी डॉक्टर त्याच्या पोटाची पाहणी करत असतात. नंतर हे पोट कापलं असता आतमध्ये मगर दिसत आहे. ही 5 फुटांची मगर बाहेर काढली जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
भूवैज्ञानिकांनी फ्लोरिडामध्ये बर्मी अजगरांचा मृत्यू होणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. "दक्षिण फ्लोरिडाच्या उष्णकटिबंधीय वातावरणामुळे, बर्मी अजगरांचं आयुष्य वाढलं असून जोडीने संख्याही वाढत आहे. या सापांनी एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कसारख्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात यशस्वीरित्या आक्रमण केले आहे. अजगरांच्या आहाराची प्राधान्यं विस्तारत असल्याने येथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे," असं रोझी मूर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Burmese pythons ला पाळीव प्राणी म्हणून अमेरिकेत आणण्यात आलं होतं. पण 1970 मध्ये लोकांनी त्याला एव्हरग्लेड्समध्ये सोडलं आहे, तेव्हापासून ते धोकादायक ठरले आहे. फ्लोरिडामध्ये अजगराची संख्या किती आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण ही संख्या 1 लाखांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.