अशी GirlFriend हवी, टल्ली झालेल्या BoyFriend ला खांद्यावर उचलून नेलं, पाहा Video

नव्या वर्षाच्या पार्टीनंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडने चक्क पाठिवर उचलून नेलं, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे

Updated: Jan 7, 2023, 07:35 PM IST
अशी GirlFriend हवी, टल्ली झालेल्या BoyFriend ला खांद्यावर उचलून नेलं, पाहा Video title=

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ विचार करायला भाग पडतात. काही व्हिडिओ तर असे असतात, जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचं डोकं चक्रावलं आहे. इतकंच नाही तर लोकांना विचार करायलाही भाग पाडलंय. 

कपलचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. एक तरुण मुलगी (GirlFriend) आपल्या बॉयफ्रेंडला (Boy Friend) खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसत आहे. न्यू यॉर्क पोस्ट (NY Post) दिलेल्या वृत्तानुसार या तरुणीचा बॉयफ्रेंड मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला चालताही येत नव्हतं. शुद्ध हरपलेल्या बॉयफ्रेंडला घरी कसं घेऊन जावं, असा प्रश्न या तरुणीला पडला होता. शेवटी तीने त्याल थेट खांद्यावर उचलून घेतलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तीस लाखहून अधिक वेळा पाहिला गेलाय. (girlfreind stumbling boyfriend home on her back)

ही घटना नवीन वर्षाच्या (New Year Party) संध्याकाळची आहे. पार्टी संपवून हे कपल हॉटेलबाहेर पडलं. पण तरुणीच्या बॉयफ्रेंडने इतकी दारू ढोसली होती की त्याला चालताही येत नव्हतं. नाईलाजास्तव त्या मुलीने बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून घेतलं. भर गर्दीतल्या रस्त्यावर तरुणीने केलेल्या या कृत्याने बघणारे देखील हैराण झाले. 

हे ही वाचा : दिल्ली दुर्घटनेतील अंजलीच्या कुटुंबियांसाठी 'पठाण' आला धावून, आर्थिक मदतीचा हात

 

स्त्यावरील काही जणांनी तरुणीचा हा स्टंट मोबाईल कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. 11 सेकंदाच्या या व्हिडिओला 30 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. न्यू यॉर्कमधला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओवर अनेक जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही जणांनी अशी गर्लफ्रेंड हवी, जी आपल्या पार्टनरसाठी काहीह करायला तयार असल्याचं म्हटलंय. तर काही जणांनी त्या तरुणाला नशीबवान म्हटलं आहे. 

380 फूट उंच धबधब्यावर तरुणीचा स्टंट
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ (Video) वेगाने व्हायरल होत होता. व्हिडिओ बनवण्यासाठी एका महिलेने तब्बल 380 फूट उंच धबधब्यावर (Water Fall) खतरनाक स्टंट केला आहे. केवळ दोन दिवसात तब्बल 2 करोड लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. या व्हिडिओवरुन नेटिझन्समध्येही (Netizen) वाद निर्माण झाला. काही जणांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर काही जणांनी या महिलेवर जोरदार टीका केली आहे.