Viral Video : हॉटेलमध्ये बिलावरुन वेटर आणि ग्राहकांमध्ये भांडणं झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. कधी वाढीव बिलावरुन तर कधी बिलात टीपचे पैसे आकारल्याने भांडणं होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर हॉटेलचा एक व्हिडिओ व्हायरल (होत आहे. या व्हिडिओत 8 जणांचं एक कुटुंब अव्वाच्यासव्वा बिल (H करून पैसे न भरताच पसार झाल्याचं पाहिला मिळतंय. या कुटुंबाने तब्बल 34 हजार रुपायंचं बिल बनवलं. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. (Family Leaves Without Paying Bill)
हॉटेलला असा लावला चूना
हॉटेल व्यवस्थापनाने या कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यासोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. कुटुंबातील महिलिने आपल्या कार्डद्वारे हॉटेलचं बिल भरण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा प्रयत्न करुनही कार्डमधून पेमेंट झालं नाही. त्यानंतर या महिलेने आपण घरी जाऊन नवीन कार्ड घेऊन येतो, असं हॉटेल मॅनेजरला सांगितलं. कार्ड घेऊन येई पर्यंत आपला मुलगा हॉटेलमध्येच थांबेल असंही त्या महिलेने सांगितलं. बराच वेळ उलटून गेल्यानंतरही महिला हॉटेलमध्ये परतली नाही. तर हॉटेलमध्ये थांबलेला मुलगा गर्दीचा फायदा नजर चुकत हॉटेलमधून गायब झाला. मुलगा हॉटेलमधून गायब झाल्यानंतर कुटुंबाने फसवल्याचं हॉटेल मॅनेजरच्या लक्षात आलं.
बुकिंग करताना दिला खोटा नंबर
संपूर्ण कट आखून या कुटुंबाने हॉटेलची फसवणूक केली होती. हॉटेलमध्ये जागा बूक करताना या कुटुंबाने जो नंबर दिला होता तो ही चुकीचा होता. यानंतर हॉटेलने त्या कुटुंबाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोस्टमध्ये हॉटेल व्यवस्थापनाने आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याचंही सांगितलं. पोस्टमध्ये हॉटेलने म्हटलय. ' आमच्याकडे तुम्हाला संपर्क करण्याचा दुसरा कोणताच पर्यात नव्हता. तुम्ही रिझर्व्हेशनसाठी दिलेला मोबाईल नंबरही खोटा आह. त्यामुळे तुमची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हॉटेलची फसवणकू करण्याचा प्रकार लज्जास्पद आहे' असंही या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.
हॉटेल व्यवस्थापनाने या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जारी केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक महिला आणि तिच्या बाजूला एक मुलगा हॉटेलच्या काऊंटरजवळ उभे असलेले दिसतायत. ही महिला आपल्याजवळच्या डेबिट कार्डने बिल भरण्याचं करतेय, पण कार्डमधून पैसे चुकते होत नाहीत.
व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतंर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, हॉटेलने फसवणूक करणाऱ्या या कुटुंबाचा फोटो प्रिंट करुन तो हॉटेलमध्ये लावला पाहिजे. तर एका युजरने म्हटलंय, ऑर्डर करतानाच पैसे घेण्याची पद्धत सुरु करायला हवी.