लंडन : प्रत्येक दांपत्य असा विचार करत असतो की, माझी बायको किंवा माझा नवऱ्याचं माझ्यावरती प्रेम आहे की, नाही? आणि हे ओळखायचं कसं? हा सगळ्यात मोठा प्रश्न लोकांसमोर उद्भवतो. परंतु लोकांच्या या प्रश्नांच उत्तर कदाचित आज मिळेल. कारण अमेरिकेच्या एका सर्वेक्षणात असे सांगितले गेले आहे की, तुमची बायको तुम्हाला किती वेळा मिठी मारते आणि किस्स करते यावर तिचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे कळते.
'डेली मेल' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात, एका नवीन सर्वेक्षणाबद्दल सांगण्यात आले की, जर महिला आपल्या पतीवर प्रेम करत असेल ,तर त्याला मिठी मारते आणि त्याला किस्स करते, त्याच बरोबर ती नवऱ्याकडे नखरे ही कमी करते.
अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, पुरुष हे महिलांप्रमाने रोमँटिक नसतात. त्यामुळे ते आपल्या पत्नीला घरकामात हातभार लावून आपले प्रेम व्यक्त करतात.
अमेरिकेमध्ये झालेल्या या सर्वेक्षणात 168 जोडप्यांचा समावेश होता. ज्यामध्ये पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तसेच यामध्ये असे ही आढळले की, स्त्रिया या नकारात्मक विचार जास्त करतात. त्याच बरोबर त्या आपल्या भावना लपवून प्रेम व्यक्त करतात. तर दुसरीकडे पुरुषांनी कपडे धुऊन किंवा घरगुती कामात मदत करून आपले प्रेम व्यक्त करतात.
ज्या पतीचे आपल्या पत्नीवर जास्त प्रेम आहे, असे जोडपे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवणे पसंत करतात. पती पत्नीला मदत करुन त्यांची कामूक इच्छा व्यक्त करतात. या संदर्भात, संशोधक म्हणाले की, पुरुषांसाठी आपले प्रेम व्यक्त करण्याचे हे एक महत्त्वाचे माध्यम आहे.
या अभ्यासात असे म्हटले आहे की, महिलांनी कामुक उपक्रम सुरू करण्याची शक्यता कमी आहे. हा अभ्यास 'पर्सनॅलिटी एंड सोशल साइकोलॉजी बुलेटिन' मध्ये प्रकाशित झाला आहे.