आज आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून, या मागचे जोतिषशास्त्र काय सांगतंय जाणून घ्या

गुरुवारी संध्याकाळी म्हणजेच 24 जूनला आकाशात एक अनोखा नजारा पहायला मिळणार आहे. 

Updated: Jun 24, 2021, 08:36 AM IST
आज आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून, या मागचे जोतिषशास्त्र काय सांगतंय जाणून घ्या title=

मुंबई :  गुरुवारी संध्याकाळी म्हणजेच 24 जूनला आकाशात एक अनोखा नजारा पहायला मिळणार आहे. 24 जूनची संध्याकाळ ही प्रत्येक संध्याकाळपेक्षा वेगळी असणार आहे. कारण  आकाशात चंद्र स्ट्रॉबेरीच्या रंगाचा दिसणार आहे. या अनोख्या खगोलीय घटनेला स्ट्रॉबेरी मून (Strawberry Moon)असे म्हणतात. या दिवशी चंद्र आकाराने मोठा आणि स्ट्रॉबेरीसारखा गुलाबी रंगाचा दिसणार आहे. जून पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या या चंद्राला बऱ्याच ठिकाणी रेड मून (Red Moon), हॉट मून (Hot Moon)किंवा हनी मून देखील म्हणतात.

स्ट्रॉबेरी मूनचे महत्त्व

चंद्र त्याच्या सामान्य कक्षेपेक्षा पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे, तो त्याच्या आकारापेक्षा खूपच मोठा दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रात जूनच्या या पौर्णिमेला खूप चांगला दिवस मानला जातो. धर्मग्रंथांमध्ये, गंगा स्नान, पूर्वजांची पूजा करणे आणि दान करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी चंद्र त्याच्या 16व्या कलेत असणार आहे.

या दिवशी काय करायचे? 

या दिवशी भगवान विष्णू आणि श्री कृष्ण यांची पूजा केली जाते. या दिवशी नदीत आंघोळ करुन दान केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी उपवास देखील केला जातो. असे म्हटले जाते की, या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे चांगले फळ प्राप्त होते.

स्ट्रॉबेरी मून भारतात दिसणार नाही

परंतु हे स्ट्रॉबेरी चंद्र भारतात दिसू शकणार नाही, यामागील कारण म्हणजे, स्टँडर्ड वेळेनुसार चंद्र 11.15 वाजता येतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी मून 11.15 वाजता दिसणार आहे आणि भारतीय वेळेनुसार ही वेळी दुपारी 2.35 पर्यंत आहे. ज्यामुळे आपल्याकडे दिवस असल्याने हा चंद्र पाहाता येणार नाही.