जोडप्याने एका मिनिटासाठी केले असे काम, आले 19 हजार कोटींचे बिल

Shocking News : एका तरुण जोडप्याला विजेचे बिल (Energy Bill) आल्याने मोठा शॉक बसला. 

Updated: Mar 24, 2022, 03:22 PM IST
जोडप्याने एका मिनिटासाठी केले असे काम, आले 19 हजार कोटींचे बिल  title=

लंडन : Shocking News : एका तरुण जोडप्याला विजेचे बिल (Energy Bill) आल्याने मोठा शॉक बसला. त्यानी सकाळी केवळ एक मिनिट गॅस वापरला आणि त्यांना 1.9 अब्ज पौंड (19,146 कोटी रुपये) बिल आले. 22 वर्षीय जोडपे सॅम मोट्राम आणि मॅडी रॉबर्टसन यांना त्यांच्या शेल एनर्जी अ‍ॅपवर एक मोठे बिल दिसल्यावर त्यांना धक्काच बसला.

या जोडप्याचा दावा आहे की, त्यांनी केवळ एक मिनिटासाठी गॅस वापरला आहे. ज्यासाठी खूप मोठे बिल आले आहे. ही बातमी जेव्हा एका यूजरने वाचली तेव्हा तो म्हणाला, 'जर आम्हाला अशी माहिती मिळाली असती तर आम्हाला हार्ट अटॅक आला असता!' काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

अचानक गॅसचे बिल हजारो कोटींचे 

इंग्लंड येथे हार्पेंडेन, हर्ट्समध्ये (Harpenden, Herts) राहणारे हे जोडपे साधारणपणे त्यांच्या गॅस आणि विजेवर वर्षाला सुमारे 1300 पाउंड (1 लाख तीस हजारांहून अधिक) खर्च करतात. 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सॅम म्हणाला, 'मॅडीला वाटले मला चुकीचे बिल आले आहे, तिला वाटले मी मूर्ख बनवत आहे. पण होय, यामुळे आम्हालाही हसायला आले. मला माझ्या फोनवर एक सूचना मिळाली की मला माझे ऑटो डेबिट डेबिट कार्ड अपडेट करायचे आहे. त्यानंतर मला थोडं विचित्र वाटलं. मला माहित होते की किंमती वाढणार आहेत पण मी इतका विचार केला नाही.

bill

दाम्पत्याने तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने, जोडप्याकडे एवढी रक्कम नव्हती, नाहीतर संपूर्ण पैसे आपोआप कापले गेले असते. प्रकरण पुढे गेल्यावर शेल एनर्जीने तांत्रिक बिघाड असल्याचे कारण दिले. ही रक्कम यूकेच्या गॅस आणि विजेवरील एकूण घरगुती खर्चाच्या 15 टक्के आहे.

शेल एनर्जीचे स्पष्टीकरण

शेल एनर्जीच्या प्रवक्त्याने सांगितले: "आमच्या अ‍ॅपमधील त्रुटीमुळे काही ग्राहकांना त्रास सहन करावा लागला आहे. आम्ही सॅम आणि मॅडीने जगाच्या गॅस पुरवठ्यासाठी पैसे देण्याची अपेक्षा करत नाही. अ‍ॅपच्या त्रुटीमुळे ग्राहकाला शेल एनर्जीने खात्री दिली आहे, त्याचा त्यांच्या डायरेक्ट डेबिट पेमेंटवर परिणाम होणार नाही.