Viral News : मूर्ती लहान पण किर्ती महान...असाच एक मुलगा वय वर्ष 17 पण हा महिन्याला 16 लाख रुपये कमवतोय. त्याच काम एवढं वाढलंय की, त्याने शाळा सोडून कामावर लक्ष केंद्रित केलंय. हा पठ्ठा ऑनलाइन काम करुन 16 लाख कमवतो. खरं तर डिजिटलच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे अनेक संधी सहज उपलब्ध आहे. या ऑनलाइनच्या जगात लहान मोठा अगदी वयाच बंधन नाही. तुमचे जितके जास्त फॉलोअर्स तितकी तुमची संपत्ती. कंटेंट निर्मिती आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आज अनेक लोक श्रीमंत झाले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शाळा सोडून 17 वर्षांचा हा मुलगा नेमकं करतो तरी काय? (Viral News Age 17 but earns 16 lakh rupees a month selling stickers online Caelan Mcdonald)
न्यूयॉर्क पोस्टनुसार, या 17 वर्षांच्या मुलाच नाव कैलिन मॅकडोनाल्ड असं आहे. तो एक ब्रिटीश मुलगा आहे. त्याचा आईच्या एका गिफ्टने त्याला श्रीमंत केलंय. होय, दोन वर्षांपूर्वी ख्रिसमससाठी 49 वर्षीय आई कॅरेल न्यूजहॅम हिने तिला सर्किट जॉय म्हणजे डिजिटल ड्रॉइंग, कटिंग आणि प्रिंटिंग मशीन गिफ्ट म्हणून दिली. यानंतर कैलिन मॅकडोनाल्ड आयुष्याला एक वेळीच कलाटणी मिळाली. त्याला ख्रिसमसमध्ये मिळालेल्या गिफ्टमधून संधीच सोनं केलं. त्याने या मशिनच्या सहाय्याने ऑनलाईन पैसे कमावयला सुरुवात केली. तो या मशिनद्वारे ट्रान्सफर प्रिंट्स तयार करतो. हे प्रिंट्स काचेच्या वस्तूंवर चिकटवली जातात. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर याचे हे ट्रान्सफर प्रिंट्स शेअर करण्यास सुरुवात केली. त्याला या कामातून पैसे मिळाल्या लागले.
सर्वातीला तो शाळेतून आल्यानंतर हे काम करायचं. पण आता त्याचा व्यवसायाचा आवाका एवढा वाढला की, त्याने आता शाळा सोडली आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी 200 हून अधिक वस्तू विकल्या. जुलै 2024 मध्ये शाळा सोडल्यानंतर, Kailyn ने एक मोठे प्रिंटर मशीन विकत घेतले. त्यानंतर त्याने TikTok शॉप आणि इतर प्लॅटफॉर्मवर 79,93,810 रुपयांचे स्टिकर्स आतापर्यंत विकले आहेत. Kaileen अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे स्टिकर्स विकून वर्षाला लाखो रुपये कमावतो.
काइलीन म्हणाला, 'माझ्या आईकडून मला मिळालेली ही सर्वात अप्रतिम ख्रिसमस भेट आहे, मला असे काही घडेल याची कल्पना नव्हती, हे सर्व अचानक घडले. जूनमध्ये मला वाटले, आपण प्रयत्न करू या, पण मला हे काम माहित नव्हतं. पण आता मी हिट झालो, आता मी इतका व्यस्त आहे की माझ्याकडे वेळ इतर गोष्टींसाठी वेळ नाही.'