viral video - स्मार्टफोन आल्यापासून आत्ताची पिढीही स्मार्ट झाली आहे. मात्र स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुणाईचा बहुतांश वेळ हा वाया जातो. तरुणाई सोशल मीडियावर सक्रीय असते. तरुण-तरुणी आपले अनेक फोटोस आणि व्हीडिओ सोशल मीडियावर टाकतात. सोशल मीडियाचं वाढतं वेड यामुळे तरुण पिढीचा जास्त जास्त वेळ हा मोबाईल फोनवर जातो. तरुण पिढीसोबत मोबाईलचं वेड प्राण्यांना पण लागलं, असं वाटतं आहे. तुम्ही म्हणाल असं का म्हणतो आहोत आम्ही. कारण सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात माकड मोबाईलचा आनंद घेताना दिसतायेत.
माकड हे आपले पूर्वज आहेत असं म्हणतात. मग आपलं अनुकरण ते करणारचं. सध्या जिकडे पाहा तिकडं लोकांच्या हातात मोबाईल दिसतो. मग हा आपला पूर्वज माकड यापासून कसा वाचणार. या व्हीडीओमध्ये माकडांचा घोळका मोबाईलाभोवती दिसतोय.
मोठ्या उत्साहाने ही माकडं मोबाईलमधील फोटो आणि व्हिडीओ पाहत आहेत. मोबाईल पाहताना या माकड्यांचे हावभाव बघण्यासारखे आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.
बघितलं, कसं हे माकड मोबाईल हाताळताना दिसत आहेत. या पाच माकडांमधील मोठं माकड मोबाईलच्या स्क्रीनला हात लावताना दिसत आहे. त्याला कदाचित कळत नाही की या छोट्याशा मोबाईलमध्ये आपण कसे दिसतो. तर मोबाईलच्या स्क्रीनला हात लावताच पुढेही आपणच दिसतो. त्यांना प्रश्न पडला असेल ना, ''बाहेर पण आपण आणि आत पण आपणच, हे कसं होऊ शकतं.''
माकड मोबाईलवर स्वत:चा फोटो आणि व्हीडीओ बघण्यासाठी उत्सुक हे पाहणं जरा असमान्य दृश्य वाटतं. पण या व्हीडीओतील माकडांना पाहून एकच म्हणावसं वाटतं ''हे माकड किती स्मार्ट'' आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत.