Istanbul Bomb Blast : सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स, मृतदेहांचा ढीग, अन् काळीज पिळवटणारा आक्रोश...

Istanbul Bomb Blast : बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. 

Updated: Nov 14, 2022, 10:06 AM IST
Istanbul Bomb Blast : सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स, मृतदेहांचा ढीग, अन् काळीज पिळवटणारा आक्रोश... title=
Video Bomb Blast In Turkey 2022 Trending Video viral on social media nmp

Bomb Blast In Turkey Trending Video : आताची सर्वात मोठी बातमी, तुर्कीच्या इस्तंबूल शहरातील सर्वात गर्दीच्या ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. 

थरकाप उडविणारा व्हिडीओ 

तुर्कस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्फोट रविवारी संध्याकाळी 4.20 वाजता झाला. स्थानिक वेळ (1330 GMT). या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर खूप गर्दी आहे. लोक मार्केट परिसरात फिरत असताना अचानक मोठा आवाज होता. हे पाहून पादचारी अचानक पाठ फिरवतात, तर काही जण पळायला लागतात. (Video Bomb Blast In Turkey Trending Video viral on social media nmp)

मृतदेहांचा ढीग!

दहशतवादी हल्ल्यानंतर सगळीकडे एकच अफरातरफी माजली. बघावं तिकडे मृतदेहांचा ढीग दिसतं आहोता. सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स आणि पोलीस... अन् काळीज पिळवटणारा आक्रोश...
मन पिळवटून टाकणारे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात आहे. 

इस्तिकलालमधील स्फोटाबाबत गृहमंत्री सोयलू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बॉम्बरला ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारी अनादोलू वृत्तसंस्थेनुसार, पाच सरकारी वकिलांना स्फोटाचा तपास सोपवण्यात आला आहे.