मुंबई : एखाद्या व्यक्तीला कोणती सवय असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. खाण्याच्या सवयींमध्ये एखादी व्यक्ती काय खाईल याचा काही नेम नाही. एक महिला चक्क आपल्या मृत पतीची राख खात होती. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने राख खाऊन तब्बल 19 किलो वजन कमी केलंय.
न्यूयॉर्कमधील टेनेसीस्थित महिला कॅसीने अलीकडेच 'माय स्ट्रेंज ऍडिक्शन' या टेलिव्हिजन शोमध्ये आपल्या मृत पतीची राख खाल्ल्याची कबुली दिली. खरं तर, या शोमध्ये लोक त्यांच्या विचित्र सवयींबद्दल सांगतात. याची कबुलीही केसीने लाईव्ह शोमध्ये दिली आहे. केसीच्या या गोष्टीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
टेनेसीस्थित महिला केसीने टेलिव्हिजन शोमध्ये तिच्या विचित्र व्यसनाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिची खूप चर्चा होत आहे. केसीने सांगितले की ती तिच्या मृत पतीची राख खात आहे. 'माय स्ट्रेंज ऍडिक्शन' या दूरचित्रवाणी कार्यक्रमात केसीने पहिल्यांदाच याबद्दल तपशीलवार चर्चा केली. त्यांनी राख खाण्याची सवय कशी लावली हे सांगितले.
केसी 2009 मध्ये पती सीनला भेटली आणि एकमेकांना ओळखल्यानंतर 10 महिन्यांत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने, हे दोघे जास्त काळ एकत्र राहू शकले नाहीत कारण झिऑनला दम्याचा झटका आला. आणि यामध्येच तिचं निधन झालं.
केसीने झिऑनचा राखेचा कलश तिच्याकडे ठेवला. तिने सांगितले की मी माझ्या पतीला सर्वत्र घेऊन जाते. किराणा दुकान असो, शॉपिंग असो, चित्रपट असो, रेस्टॉरंट असो, मी कुठेही जाते, तेव्हा त्याच्या राखेचा कलश माझ्यासोबत असतो.
केसी तिच्या पतीच्या खूप जवळहोती, ती कलशला मिठी मारून झोपी जायची. दुसऱ्या कलशात राख टाकत असताना केसीच्या हातावर काही राख पडली. तिला राख पुसायची नव्हती. म्हणून, तिने बोटे चाटली. तेव्हापासून ती राख खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. ती राख दिवसातून किमान पाच वेळा चाटते.
केसी म्हणते, की तो माझा नवरा आहे आणि मला त्याला गमवायचे नव्हते. पण जवळपास दोन महिने झाले तरी मी स्वतःला थांबवू शकत नाही. केसी म्हणाले की राखेची चव कुजलेली अंडी, वाळू आणि सॅंडपेपरसारखी असते. पण मला याचे व्यसन आहे.
केसी म्हणाले की, दोन महिन्यांत तिने 19 किलो वजन कमी केले. कारण ते राखेमुळे होते. कलश उघडताच तिलाला राख खाल्ल्यासारखं वाटतं, पण हा आनंद लवकरच लाजिरवाणा आणि अपराधीपणात बदलतो. केसीला हे सर्व थांबवायचे आहे कारण तिला तिचा नवरा पुन्हा गमावायचा नाही.