ट्रम्प यांचे नवे फर्मान,आठ देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी

 'मुस्लिमांवर बंदी' असे म्हणत या आदेशाची जगभरातील विरोधकांकडून निंदा केली जात आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 10:21 PM IST
ट्रम्प यांचे नवे फर्मान,आठ देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासह आठ देशांच्या नागरिकांवर प्रवास निर्बंध लादण्याचा नवा आदेश जारी केला आहे. मूळ प्रवास निर्बंधाचा विस्तार करुन त्यात अधिक देशांना समाविष्ट केले आहे.  'मुस्लिमांवर बंदी' असे म्हणत या आदेशाची जगभरातील विरोधकांकडून निंदा केली जात आहे. 

याआधी ६ मुस्लिमबहुल देशांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा दिलेला विवादीत आदेश संपुष्टात येत आहे.हा नवा नियम १८ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.यामध्ये इराण, लिबिया, सोमालिया, सीरिया आणि येमेन आधीच समाविष्ट आहेत. उत्तर कोरिया, व्हेनेझुएला आणि चाड या देशांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर काही दिवसातच प्रवास बंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. ट्रम्प यांनी जाहिर केलेल्या यादीतू सुडानचे नाव काढण्यात आले आहे. इराक नागरिकांना प्रतिबंध नसेल पण जाचक अटींचा सामना करावा लागणार आहे.

"अंतर्गत सुरक्षा विभागामार्फत गंभीर आढावा घेतल्यानंतर आम्ही आज अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी किमान सुरक्षा स्थापित करण्यासाठी पावले उचलली असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले."अमेरिकेतील लोकांची सुरक्षा व सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. नवीन प्रवास बंदीचा आदेश देत मी माझे कर्तव्य पूर्ण करीत असल्याचे ते कर्तव्यांची जबाबदारी पार पाडत आहे " असेही ते म्हणाले.