वॉशिग्टंन : अमेरिकेमध्ये खेळाडूंनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याची घटना घडली आहे. खेळाडूंनी जाणूनबुजून राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर खेळाडूंनी हे पाऊल उचललं आहे.
अमेरिकेमध्ये पोलिसांकडून कृष्णवर्णीयांवर निशाणा साधण्यात येतोय. त्यामुळे या नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे. या कारणासाठी नॅशनल फूटबॉल लीगदरम्यान काही खेळाडू राष्ट्रगीत सुरू असताना नीट उभे राहिले नाहीत.
खेळाडूंनी केलेल्या या वर्तनाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना खेळाडूंच्या या वागणुकीचं स्वागत केलंय तर काहींनी विरोध केला आहे. डोनाल़्ड ट्रम्प यांनी या घटनेवर आक्षेप घेतला आहे. जे लोक आपला देश आणि झेंड्यासाठी उभे राहू शकत नाहीत, त्यांना लीगमधून बाहेर काढलं पाहिजे. जे लोकं देशाचा अपमान करतात, ते खेळाच्या लायक नाही, असं ट्रम्प म्हणालेत.
ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर लंडनच्या वेंबले स्टेडियमवर अमेरिकेतल्या दोन टीममध्ये मॅच झाली. यावेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताला सुरुवात झाली. मॅचआधी ब्रिटीश राष्ट्रगीत सुरु झालं तेव्हा खेळाडू उभे राहिले, पण अमेरिकेचं राष्ट्रगीत सुरु झालं तेव्हा खेळाडू गुडघ्यावर उभे राहिले.