Twitter ने म्हटले ट्रम्प यांचे ट्विट दिशाभूल करणारे, अमेरिका अध्यक्षांचा पारा चढला आणि...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या दोन ट्वीटला सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने (Twitter) दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.  

Updated: May 27, 2020, 11:04 AM IST
 Twitter ने म्हटले ट्रम्प यांचे ट्विट दिशाभूल करणारे, अमेरिका अध्यक्षांचा पारा चढला आणि... title=
संग्रहित छाया

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या दोन ट्वीटला सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने (Twitter) दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या ट्विटबरोबर ट्विटरने फॅक्ट चेक वॉर्किंगची लिंक लावली आहे. ट्विटरच्या या कारवाईवर संतापलेल्या ट्रम्प यांनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध हे आहे, असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर ट्रम्प यांनी याला अमेरिकन अध्यक्ष निवडणूक 2020 मधील (US President Elections 2020) हा एक प्रकारचा हस्तक्षेप आहे, असे म्हटले आहे.

मंगळवारी ट्विटरने ट्रम्प यांच्या दोन ट्विटवर फॅक्ट चेक वॉर्किंग लावले आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये बनावट मतपत्रिका वापरणे आणि मेल बॉक्सची चोरी होत असल्याचा दावा केला आहे. तर सीएनएन (CNN ) आणि वॉशिंग्टन फॅक्ट चेक टीमने हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. आता या ट्वीटवर एक लिंक येत आहे, ज्यावर हे लिहिले आहे, मेल-इन-बॅलेटसंबंधी तथ्य जाणून घ्या. यावर क्लिक केल्यावर यूजर्स फॅक्ट चेक पेजवर जातील.

या कारवाईने संतापलेल्या ट्रम्प यांनी ट्विटरवर निशाणा साधला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे, 'ट्विटर आता २०२० च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतही हस्तक्षेप करत आहे.  मेल-इन बॅलेटसंदर्भात माझे विधान खोटे असल्याचे कारणीभूत ठरेल. हे चुकीचे आहे. ही बनावट बातमी सीएनएन आणि अ‍ॅमेझॉन वॉशिंग्टन पोस्टच्या सत्य-तपासणीवर आधारित आहे.  तर, दुसर्‍या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी लिहिले आहे, 'ट्विटर बोलण्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला करत आहे. अध्यक्ष म्हणून मी हे होऊ देणार नाही.

दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या  (Coronavirus) वाढत्या घटनांमध्ये डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळताना दिसले. ज्यामुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. आता पुन्हा वाद निर्माण झाल्याने ट्रम्पसाठी ही डोकेदुखी ठरत आहे.