Viral News: विवस्त्र होऊन घरकाम करणारी मोलकरणी! घरोघरी जाऊन करते साफसफाईची कामं

UK Woman Cleaner On Creepy Clients: तिने 2017 साली अधिक पैसे मिळवण्यासाठी मोलकरीण म्हणून काम सुरु केलं. मागील 6 वर्षांमध्ये तिने क्लायंट्ससाठी काम केलं असून तिला यादरम्यान काहीवेळा वाईट अनुभवही आले आहेत.

Updated: Mar 16, 2023, 06:12 PM IST
Viral News: विवस्त्र होऊन घरकाम करणारी मोलकरणी! घरोघरी जाऊन करते साफसफाईची कामं title=
Cleaning Home

Woman Cleaner About Creepy Clients: ब्रिटनमधील 32 वर्षीय लोटी रे नावाची महिला 2017 पासून घरोघरी जाऊन मोलकरणीचं काम करते. मात्र ही महिला तुम्हाला वाटते तशी सामान्य मोलकरणी नाही. ती केवळ साफसफाईचं काम करते. तसेच या महिलेचं वैशिष्ट्य म्हणजे ती ज्या घरांमध्ये काम करते तिथे ती अंगावरील सर्व कपडे काढून पूर्णपणे नग्नावस्थेत साफसफाईचं काम करते. 

कपडे काढून काम करते म्हणून...

मागील 6 वर्षांपासून लोटी रे हे काम करत आहे. तिने पैसे कमवण्याच्या हेतूने मोलकरणीचं काम स्वीकारलं. मागील 6 वर्षांमध्ये तिने हजारो पौंडची कमाई केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लोटी रेने तिला या 6 वर्षांच्या काळात आलेले अनुभव आणि तिच्या या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साफसफाईचं काम करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या 6 वर्षात आपण अनेकांच्या घरी कामं केली आहेत. अनेकांना केवळ कोणीतरी काम करणारं हवं असतं. तर काहींना माझ्या कामाच्या पद्धतीने 'काहीतरी अधिकचा लाभ मिळेल' अशी अपेक्षा असते, असं सूचक विधान लोटीने आपल्या मुलाखतीमध्ये केलं आहे. तसेच नग्नावस्थेत काम करण्याची सवय लागल्याने आपला आत्मविश्वास दुणावला आहे, असंही लोटी सांगते.  

तासाचे 5 हजार

लोटी आपल्या क्लायंट्सकडून तासाचे 5 हजार रुपये घेते. "मला याचा चांगला आर्थिक मोबदला मिळत नसता तर मी हे काम केलं नसतं," असं लोटी सांगते. चांगला आर्थिक मोबदला मिळत असला तरी अनेकदा आपल्याला वाईट विचारसरणीच्या लोकांना तोंड द्यावं लागतं असंही लोटी सांगते. अर्थात प्रत्येक क्लायंट हा आपल्याकडे तशा नजरेने पाहत नाही. पण 6 वर्षात अनेकदा वाईट नजरेनं पाहणाऱ्या आणि नको त्या अपेक्षा ठेवणाऱ्या क्लायंट्सला आपण भेटलो आहोत असंही लोटी सांगते. "अनेकांना मी थेट साफसफाई या एकमेव कामासाठी येते असं सांगितलं आहे. मात्र त्यांच्याकडून यापूर्वी आलेल्या अशा महिला स्ट्रीपर्स किंवा मसाज देणाऱ्या होत्या असं सांगितलं जातं," असंही लोटी म्हणाली.

त्याने टीव्हीवर लावलेला अश्लील व्हिडीओ

वेगवेगळ्या वयोगटातील आपले क्लायंट्स आहेत असं लोटी सांगते. काही वयस्कर व्यक्तींना केवळ कामासाठी आपली सेवा हवी असते. तर अनेक तरुण श्रीमंत व्यक्ती काहीतरी वेगळ्यापद्धतीची सेवा म्हणून मला संपर्क करतात. आपले अनेक क्लायंट हे सुशिक्षित आणि चांगले संबंध ठेवणारे आहेत असं लोटी अभिमानाने सांगते. मात्र काही प्रसंगांना तोंड देताना आपल्याला शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याचंही लोटी सांगते. "एका घरी मी साफसफाईसाठी गेले होते तेव्हा त्या घरात एकट्याच राहणाऱ्या तरुणाने टीव्हीवर अश्लील व्हिडीओ लावला होता. तो इशाऱ्यांमध्ये बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत होता मात्र मी त्याला स्पष्ट नकार दिला. अनेकदा अशा वेगळ्या इच्छा मनात असलेल्या व्यक्तींची घरं स्वच्छ असतात. यामधूनच मला काय ते समजून येतं," असं लोटी म्हणाले.