धक्कादायक| 'या' ठिकाणी आढळले कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 2 रुग्ण

जगात पुन्हा एकदा जुन्या कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिएंटमुळे (Covid 19 New Variant) सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Updated: Nov 27, 2021, 10:13 PM IST
धक्कादायक| 'या' ठिकाणी आढळले कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 2 रुग्ण title=

लंडन : जगात पुन्हा एकदा जुन्या कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिएंटमुळे (Covid 19 New Variant) सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशासह राज्यातील सर्व यंत्रणांनी कंबर कसली आहे. अशातच सर्वांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे दोन रूग्ण इंग्लंडमध्ये आढळले आहेत. इंग्लंडमधील बाधित रूग्ण दक्षिण आफ्रिकेत प्रवास करून आले होते. ते दोघेही सध्या स्वतः विलगीकरणामध्ये आहेत. तसंच त्यांचा ठावठिकाणीही सापडल्याचं सांगण्यात आलंय.ब्रिटेनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद (Sajid Javed) यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. (two cases detected of new corona variant omicron in chelmsford and nottingham says health minister sajid javed on twitter) 

ट्विटमध्ये काय म्हंटलंय? 

साजिद जावेद यांनी केलेल्या मुख्य ट्विटमध्ये या 2 जणांची माहिती दिली आहे. खबरदारी म्हणून आम्ही प्रभावित भागात नॉटिंगघम आणि चेम्सफोर्ड येथे अधिक चाचण्या करणार आहोत. सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही योग्य आणि निर्णायक पावलं उचलत आहोत", अशी माहिती या ट्विटमधून दिली आहे.

तसेच मलावी, मोझांबिक, झांबिया आणि अंगोला या दक्षिण आफ्रिकेतील भागांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी ही रविवारी मध्यरात्री 4 पासून करण्यात येणार आहे. जर तुम्ही मागील 10 दिवसांमध्ये वरील 4 या भागातून परतला असाल, तर तुम्हाला आरटीपीसीआर चाचणी करावी  लागेल, असंही या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

राज्यातही निर्बंध लागू

दरम्यान दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे राज्य सरकारही सतर्क झालंय. राज्य सरकारने कोरोना नियमांचं उल्लंघन करु नये यासाठी दंडात्मक रक्कमेत वाढ केली आहे. तसेच लोकल रेल्वेप्रमाणे लसवंतानाच बस, रिक्षा आणि टॅक्सीतून प्रवास करता येणार आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर आणि चालकालाही दंड ठोठावण्यात येणार आहे.