Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी

Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला

Updated: Feb 21, 2023, 08:30 AM IST
Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी  title=
turkey again hit by Massive earthquake 3 died more than 200 injured

Turkey Earthquake: काही दिवसांपूर्वीच तुर्कीमध्ये एकामागून एक आलेल्या भूकंपामुळं या देशाचं प्रचंड नुकसान झालं. सीरियामध्येसुद्धा भूकंपामुळं मोठं नुकसान झालं. यातून हा देश सावरत नाही तोच पुन्हा एकदा तुर्कीतील दक्षिण हैते प्रांतात नव्यानं भूकंपाचे हादरे बसले आहेत. यामध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या भूकंपात 200 हून अधिकजण जखमी झाल्याचंही कळतंय. तुर्कीतील मंत्र्यांनी स्थानिक वृत्तसंस्थांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 

देशातील आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार तुर्कीमध्ये आलेल्या अतीप्रचंड भूकंपानंतर पुन्हा एकदा दोन आठवड्यातच या देशाला सोमवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजून 4 मिनिटांनी हा भूकंप आला, ज्याची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. 

हेसुद्धा वाचा : Asteroid : विशाल लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर... NASA च्या शास्त्रज्ञांच्या दाव्यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये

पहिल्या भूकंपामागोमागत तीन मिनिटांच्या अंतरानं इथं पुन्हा 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप आला. ज्याचं केंद्र हैते येथील समंदाज प्रांतात होतं. तर, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात 16.7 किमी खोलीवर होतं. तुलनेनं दुसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू 7 किमी खोलीपर्यंत होता. 6 फेब्रुवारीला आलेल्या भूकंपापासून हे ठिकाण साधारण 100 किमी अंतर दूर होतं. सोमवारी आलेल्या या भूकंपाचे थेट परिणाम सीरिया, जॉर्डन, इस्राईल आणि इजिप्त येथे पाहायला मिळाले. 

आतापर्यंत तुर्कीत भूकंपाचे 45 हजार बळी... 

तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला आलेल्या 7.8 रिश्टर स्केल इतक्या महाभयंकर भुकंपात आतापर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार 45 हजार नागरिकांनाचा मृत्यू झाला. तुर्कीत आतापर्यंत तब्ल 6 हजार भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद स्थानिक यंत्रणांनी केली आहे. ज्यामुळं समुद्रातही उंच लाटा उसळ्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. सुरक्षिकतेतच्या कारणास्तव समुद्र किनारपट्टी भागातील स्थानिकांना प्रशासनानं तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. दरम्यान, सध्याच्या घडीला आलेल्या आणखी एका भूकंपानंतर मृतांचा आकडा वाढणार तर नाही, याचीच भीती यंत्रणांना लागून राहिली आहे.