Married Couple Exchange Partner Every Night Trending Video : चित्रपटातून आपण पत्नीची अदलाबदली आपण पाहिली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), बॉबी देओल (Bobby Deol), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बिपाशा बासू (Bipasha Basu) यांचा अनजाना पिक्चर तुम्हाला आठवत असेल. ज्यात अक्षय कुमार बॉबी देओलला पत्नी अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवतो आणि अक्षय कुमार मार खातो. पण प्रत्यक्षात आपल्याला ही गोष्ट कधीही मान्य नाही. पण काही समाजात या गोष्टीकडे वेगळा नजरेने पाहिलं जातं. या खऱ्याखुऱ्या आयुष्यात असं विवाहीत जोडपं आहे जे पत्नीची (wife swapping latest news) अदलाबदल करतात. विशेष म्हणजे हे जोडपं एकत्र राहतात. त्यांचं चार जण आणि मुलांचं कुटुंब आहे. धक्कादायक म्हणजे एकमेकांच्या पत्नीसोबत झोपतानाचा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Trending video two Married Couple Exchange Partner Every Night shared video of sleeping with each other wife Viral on Social media)
अॅलिसिया आणि टायलर रॉजर्स हे दोन मुलांसोबत एकत्र राहत होती. लग्नाच्या अनेक वर्षांनी या जोडप्याच विवाहित मित्र शॉन आणि ताया हार्टलेस यांच्यासोबत ओळख झाली. त्या ओळखचं रुपातंर प्रेमात झालं. त्यानंतर हे अमेरिकन कपल 2020 पासून एकत्र राहिला लागले. त्यानंतर त्यांचामध्ये पत्नी अदलाबदल प्रकार सुरु झालं. ते रोज रात्री एकमेकांच्या बायका अदलाबदल करतात. या अशा विचित्र प्रकारातून त्या दोन महिला गर्भवती झाल्या. अॅलिसिया आणि ताया यांनी वेगवेगळ्या मुलांना जन्म दिला.
या विचित्र नात्यातून जन्मलेल्या मुलांचे जैविक वडील कोण आहे हे त्यांना माहिती नाही. ताया यांनी अलीकडेच TODAY.com ला सांगितले की, "प्रत्येकाला समान पालकाचं प्रेम मिळावं यासाठी आम्हाला जे काही करता येईल ते करतो. कोणत्या मुलाचा जैविक वडील कोण आहे हे महत्त्वाचे नाही."
या आठ सदस्यांचं हे कुटुंब आता लेबनॉन, ओरेगॉन येथे राहतं. कुटुंबीय अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत असतात. एवढंच नाही तर त्यांनी रात्री एकमेकांसोबत झोपतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या जोडप्याचं टिकटॉकवर 120,000 तर इंस्टाग्रामवर 30,000 फॉलोअर्स आहेत. चौघांनी कबूल केले की त्यांना त्यांच्या अपारंपरिक संबंधांबद्दल ओंगळ टिप्पण्या मिळतात. या चौघांवर काही जणांनी ‘वाईट पालक’ असल्याचा आरोप केला आहे.
"आम्ही इतर सर्वांपेक्षा वेगळे आहोत, पण ते ठीक आहे आणि आम्ही आमच्या मुलांना हे स्पष्ट केले आहे की त्यांना जे व्हायचं आहे ते ते होऊ शकतात," असं त्यांनी सांगितलं आहे.