Viral Video : आई (mother) आणि मुलाचं (children) नातं खूप खास असतं. तिचं तान्हुल बाळ हे आईवर अवलंबून असतं. त्याला ना बोलता येतं ना चालतं. चिमुकल्यांसाठी त्यांची आईचं त्यांचं जग असतं. या गोंडस तान्हुल्या लेकऱ्याला सांभाळण्यासाठी आईचं पूर्ण लक्ष त्याचावर असतं. तिचं जग आता त्या मुलाच्या आजूबाजूला फिरतं असतं. त्यांच्या सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आईचा सगळा वेळ चिमुकल्याचा सेवेत जातो. सोशल मीडियावर (social media) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. तो पाहून अंगावर काटा येतो आणि आपण एकच म्हणतो अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये...
मुंबईकरांसाठी त्यांची लोकल सेवा (Mumbai Local Train video) हीच रोजच्या जीवनातील प्रवासातील साथीदार आहे. सध्या अनेक शहरात मेट्रो (Metro news) दाखल झाली आहे. सोशल मीडियावर मेट्रो (Metro video) स्टेशनवरील हा थरकाप उडविणारा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतं आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला आपल्या लाडक्या लेकाला बाबागाडीमध्ये घेऊन स्टेशनवर (Railway station video) येते. धावत जाऊन ती महिला ट्रेनमध्ये चढते आणि बाबागाडीला ट्रेनमध्ये घेण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात मेट्रोचे दार लागतं आणि बाळ स्टेशनवरच राहून जातं.
विचार करा त्या महिलेचे काय हाल झाले असतील. इकडे स्टेशनवर राहिलेल्या मुलाचं काय झालं असेल याचा तुम्ही विचार करत असाल तर चला जाणून घेऊयात. या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पाहिलं तर स्टेशनवर एक तरुण खाली बसला आहे. त्याने या मुलाला पाहिलं आणि त्याने बाळाला प्लॅटफॉर्मवर(platform) बाजूला घेतलं...व्हिडिओ पाहिल्यावर वाटतं की हा तरुण त्या चिमुरड्याचं अपहरण (kidnapping) करेल पण...(trending video mother boarded the train and the baby stayed on the Railway platform What happened next viral on Instagram)
हा तरुण त्या मुलासोबत खेळतो. त्यांचं मनोरंजन करतो त्या तान्हूल्याला अजिबात रडूदेखील देत नाही. थोड्याच वेळात स्टेशनवर दुसरी मेट्रो ट्रेन येते त्यानं त्या चिमुरड्याचे आई बाबा खाली उतरतात. स्टेशनवर आपल्या जीवाच्या तुकड्याला खेळताना पाहून त्यांचा जीवात जीव येतो. ते त्या तरुणाचे आभार मानतात.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील mr._vaseem या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.2M व्ह्यूज मिळाले आहेत. तर असंख्य कंमेट्सचा पाऊस पडला आहे.