VIDEO : अरे देवा! लोकलमध्ये मारामारी करायचा आता विमानातही सीटवरुन महिलांचं WWE

Trending Video : आता काय म्हणायचं यांना...जागा, वेळ काही कळतं की नाही या महिलांना...विमानात महिलांची कुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Jan 7, 2023, 02:47 PM IST
VIDEO : अरे देवा! लोकलमध्ये मारामारी करायचा आता विमानातही सीटवरुन महिलांचं WWE  title=
Trending Video Indigo Airlines International flight Women Flight viral on Social media

Women Flight Video : सोशल मीडियावर (Social media Video) आपल्याला महिलांचे किंवा मुलींच्या हाणामारीचे  (Girls Fight Video) अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. या मुली कधी कॉलेजच्या मैदानात तर कधी जिममध्ये क्षुल्लक कारणावरुन एकमेकांना दे दणादण चोपताना दिसतात. मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) सीटवरुन तर महिलांची कायम फ्रिस्टाईल हाणामारी (Flight Video) आपण पाहिली आहे. तसं तर या महिलांना वाद घालण्यासाठी कारणं लागतं नाही, असा समाजाचा समज आहे. त्यात जेव्हा सोशल मीडियावर महिलांचा आखाडा पाहिल्यावर हा समज पक्का होता. अशातच सोशल मीडियावर विमानातील महिलांचा WWE चा राडा व्हायरल झाला आहे. 

विमान आहे कुस्तीचा आखाडा नाही!

एकीकडे विमानातील सूसू कांड (Air India Peeing Incident) गाजत असताना विमानात महिलांची हाणामारी नेटकऱ्यांचं लक्ष वेधतं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक काळ्या कपड्यामधील महिला तिच्या मागच्या सीटवर कोणाशीतरी वाद घालते आहे. तुम्ही पुढे बघू शकता अजून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज येतो आहे. अचानक काळ्या कपड्यातील महिला सीटवरुन बाहेर येते आणि समोर येणाऱ्या महिलेवर वार करते. दे दणादण दे धपाधप विमानातच महिलांचा राडा सुरु होतो. महिलेने ठोसा मारल्यामुळे दुसऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल हवेत उडून खाली पडतो. (Trending Video Indigo Airlines International flight Women Flight viral on Social media)

व्हिडिओ व्हायरल 

या भांडण्यात अजून एक महिला सहभागी होते. विमानातच महिलांची कुस्ती सुरु होते. अखेर विमानातील काही सहप्रवासी मध्यस्थी करतात आणि या तीन महिलांना भांडण करण्यापासून रोखतात. ही घटना आंतरराष्ट्रीय इंडिगो एअरलाइन्समधील (Indigo Airlines) आहे. 

हा व्हिडिओ ट्वीटरवर BaharKeKalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता या महिला परदेशी नागरिक आहेत.  ही घटना आंतरराष्ट्रीय उड्डाणात (International flight) घडली असली तरी अशा घटनांमुळे हवाई प्रवाशांमध्ये नक्कीच चिंता निर्माण झाली आहे.