Viral News : प्रेम ही एक सुंदर भावना असते. ज्याला प्रेम होतं तोच ही भावना समजू शकतो. चित्रपटात अभिनेत्या अभिनेत्री जेव्हा प्रेमात पडतात जग किती सुंदर वाटतं, याची कल्पना येते. आजूबाजूला फक्त आनंदच आनंद दिसतो. आपल्यावर कोणी प्रेम करतं ही भावनाच किती गोड असते ना. तो प्रेम करणारा जेव्हा आयुष्य भराचा जोडीदार होतो यापेक्षा जगात दुसरं सुख नाही, असंच त्या प्रत्येक प्रेम करणाऱ्याला वाटतं. तुम्ही आम्ही प्रत्येकाला कधी ना कधी प्रेम झालेलं असतं. पण हे प्रेम जेव्हा अपूर्ण राहतं तेव्हा आयुष्यभर त्याची खोल कोपऱ्यात एक जखम राहते. पण हे नात जेव्हा कोणा एकाच्या जाण्यामुळे तुटतं त्याचा राग मनात कायम असतो. त्या क्षणाचा खूप त्रास होतो. कायम त्या व्यक्तीने आपल्याला का सोडलं हा प्रश्न सतत त्रास देत राहतो. (Trending news breakup with boyfriend then daughter made father partner viral news in Social Media)
जेव्हा हृदय तुटतो, प्रेमात धोका मिळतो ब्रेकअप झाल्यावर चांगली चांगली खंबीर माणसंही कोसळून जातात. सोशल मीडियावर एका तरुणीच्या ब्रेकअपची कहाणी जोरदार चर्चेली जाते आहे. कारण या तरुणचं ब्रेकअप झालं आणि तिने आपल्या वडिलांनाच पाटर्नर बनवलं. अहो थांबा...पाटर्नर म्हणजे, झालं असं की, ती तरुणी ब्रेकअप होण्यापूर्वी प्रियकरासह युरोपमधील एका देशात फिरायला जाण्याचं बेत आखला होता. ब्रेकअप झालं म्हणून आता फिरायचा बेत काय करायचं. ट्रीपच्या अगदी एक आठवड्यापूर्वीच तरुणीचं ब्रेकअप झालं होतं. आता तिने ठरवलं आपण फिरायला जायचं, तेही नवीन पार्टनरसोबत. म्हणून तिने वडिलांना आपला ट्रिप पार्टनर बनवलं.
ही ब्रेकअपची कहाणी आहे एम्मा डी पाल्मा या तरुणीची. ती बॉयफ्रेंडसोबत युरोप ट्रिपला जाण्यासाठी खूप उत्साही होती. आपल्या लाडक्या व्यक्तीसोबत प्रियकरासोबत पोर्तुगालला जाऊ फिरु एकत्र सुंदर क्षण व्यतित करु, या कल्पनेच ती भारावून गेली होती. पण सहलीच्या एक आठवड्यापूर्वी काही कारणाने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं. साधारण असं झालं की, समोरचा व्यक्ती खचून जातो. तो अंधारात कुठे तरी हरवतो. पण या तरुणीने ट्रिपवर जाण्याचं ठरवलं. मुलीचं मन राखण्यासाठी वडील या सहलीसाठी तयार झाले. लेक आणि बाबांनी पोर्तुगालला सहलीला जायचं ठरवलं.
एमाने या ट्रिपचा एक व्हिडीओ टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती आपल्या वडिलांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे. तिचं म्हणं आहे की, अनेकांना वाटतं असेल हा काय विचित्र प्रकार आहे. पण ती म्हणते तिनं वडिलांसोबत खूप आनंदाचे आणि सुखाचे क्षण अनुभवले आहेत.