पहिल्यांदा बातम्या वाचताना अँकरच्या डोळ्यात पाणी प्रेक्षकांनी म्हटलंय, आमच्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात...

जगातील बर्‍याच देशांमध्ये तुम्ही टीव्हीवर बातम्या देताना अँकर म्हणून फक्त पुरुष आणि स्त्रियाच दिसले असतील. पण एक ट्रान्सजेंडर (किन्नर) आता भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशमध्ये अँकर बनली आहे. तश्नुवा अनन शिशिर असे त्या अँकरचे चे नाव आहे.

Updated: Mar 9, 2021, 09:34 PM IST
पहिल्यांदा बातम्या वाचताना अँकरच्या डोळ्यात पाणी  प्रेक्षकांनी म्हटलंय, आमच्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात... title=

मुंबई : जगातील बर्‍याच देशांमध्ये तुम्ही टीव्हीवर बातम्या देताना अँकर म्हणून फक्त पुरुष आणि स्त्रियाच दिसले असतील. पण एक ट्रान्सजेंडर (किन्नर) आता भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशमध्ये अँकर बनली आहे. तश्नुवा अनन शिशिर असे त्या अँकरचे चे नाव आहे.

खरंतर, जेव्हा तश्नुवाने बांगलादेशच्या 'बोइशाखी' या राष्ट्रीय न्यूज चॅनलवर बातम्या वाचण्यास सुरूवात केली. तेव्हा तिने अनेक कट्टर लोकांना आव्हान दिले. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र ट्रान्सजेंडर तश्नुवा शिशिरची चर्चा सुरु झाली.

जेव्हा तश्नुवाने न्यूज बुलेटिन केलं, तेव्हा तिच्याबरोबर काम करणार्‍या तिच्या सहकाऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आपल्या सहकाऱ्यांना इतकं आनंदी पाहूण तश्नुवा भावूक झाली. त्यामुळे तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिचे अश्रू संपूर्ण ट्रान्सजेंडर समाजाच्या संघर्षाची कहाणी सांगत होते.

ट्रान्सजेंडर समाजाला नेहमीच भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तश्नुवाचे यश बर्‍याच लोकांसाठी एक उदाहरण बनले.

तश्नुवा आनन शिशिर ने अँकरींगची सुरूवात 3 मिनिटांच्या न्यूज बुलेटिने केली होती. जो तिच्यासाठी खूपच स्मरणीय अनुभव होता. तिने सांगितले की जन्मापासूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, तसेच समाजाने कधीही तिला चांगली वागणूक दिली नाही.

ती म्हणालली "मला याचे इतके वाईट वाटायचे की मी चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. जेव्हा मला स्वत:च्या खऱ्या ओळखीने समाजाचा सामना करता आला नाही, तेव्हा मी घर सोडले, आणि ढाका येथे एकटीच राहायला लागले."

ढाकाला जाऊन तश्नुवाने हार्मोन थेरपीवर काम केले आणि तिला अभ्यास पूर्ण करता यावा, यासाठी तिने तिथे सिनेमातही काम केले.

'बोइशाखी' टीव्हीचे प्रवक्ते जुल्फिकार अली माणिक म्हणाले, की "या परंपरावादी देशातील आव्हानांचा विचार न करता चॅनलने तश्नुवाला काम करण्याची संधी दिली.  ही सुरुवात ऐतिहासिक आहे." तश्नुवा शिशिरच्या म्हणण्यानुसार तिने अनेक वाहिन्यांमध्ये ऑडिशनही दिले पण बर्‍याच ठिकाणी तिला संधीच दिली नाही.