त्याच्या इशाऱ्यावर गायी चक्क चरणेही विसरतात

 या व्हिडिओतही हेच दिसते. गायी चरत असलेल्या ठिकाणी येतो. तिथे आल्यावर आपल्या खास शैलीत तो आवाज देतो. आणि काय गंमत गायीही धावतच त्याच्याकडे येतात.

Updated: Jul 22, 2018, 01:08 PM IST
त्याच्या इशाऱ्यावर गायी चक्क चरणेही विसरतात title=

मुंबई: आपल्यापैकी अनेकांना नेता बनण्याची हौस असते. पण, या सर्वांना नेता बनायचे असते ते माणसांचा. पण, असाही एक महाभाग आहे तो चक्क नेता आहे. पण, गाईंचा. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, गायीसुद्धा महाभागावर फिदा आहेत. त्याने आवाज द्यायचा अवकाश त्या लगेच त्याच्याकडे धावत येतात. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला याची प्रचिती येईल.

अर्थात, हा व्यक्ती कोण आहे, कुठला आहे याबाबत माहिती नाही. पण, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. झी चोवीस तास या व्हडिओची पुष्टी करत नाही. या व्यक्तीकडे अशी काय जादू आहे माहिती नाही. पण, याने आवाज दिला की, गायी धावतच याच्याकडे येतात. या व्हिडिओतही हेच दिसते. गायी चरत असलेल्या ठिकाणी येतो. तिथे आल्यावर आपल्या खास शैलीत तो आवाज देतो. आणि काय गंमत गायीही धावतच त्याच्याकडे येतात.

गायींना आवाज देण्यापूर्वी या व्यक्तीने आपली ब्रिफकेस उघडली. त्यातून कोल्ड्रींक्स काढले. ते तो प्यायला आणि मग ब्रिफकेसमध्ये असलेले काही कागद घेऊन त्याने ते वाचायला सुरूवात केली. त्यांनंतर त्याने गायींना आवाज दिला आणि गायी चरणे सोडून तडक त्याच्याकडे धावत आल्या. तो त्यांच्याशी बोललला आणि निघाला. आम्ही भाषा ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला असता तो माय डियर फ्रेंड्स, असे गायींना म्हणत असल्याचे दिसते.