दोन वर्षांच्या मुलीकडून गोळी सुटली, सात वर्षांची बहीण ठार

अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली. दोन वर्षांच्या मुलीकडून चुकून गोळी झाडली गेल्यानं तिचीच सात वर्षांची चुलत बहीण ठार झालीय. 

Updated: Jul 21, 2018, 05:22 PM IST
दोन वर्षांच्या मुलीकडून गोळी सुटली, सात वर्षांची बहीण ठार title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली. दोन वर्षांच्या मुलीकडून चुकून गोळी झाडली गेल्यानं तिचीच सात वर्षांची चुलत बहीण ठार झालीय. अमेरिकेतल्या नॅशविलेमध्ये ही घटना घडलीय. एका घरामध्ये तीन लहान मुलं खेळत होती, त्यांच्याबरोबर त्यांची काकूही होती. स्वयंपाकघरात ही तीनही मुलं खेळत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. दोन वर्षांच्या मुलीच्या हातून चुकून गोळी झाडली गेली आणि सात वर्षांची तिची हार्मनी नावाची बहीण ठार झाली.