मुंबई : तुम्ही असा विचार करत असाल की, फक्त आपणच आज स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. तर ते चुकीचं आहे.
आपल्या सोबतचं स्वातंत्र्याचा हा आनंद आज जगभरातील पाच देश देखील घेत आहेत. ज्यांना देखील स्वातंत्र्य होऊन काहीसी वर्ष झाली आहेत. जे लोकं आपल्या स्वातंत्र्याचा आनंद लुटत आहेत. जाणून घेऊया या ५ देशांबद्दल....
रिपब्लिकन ऑफ कोंगो - हा देश १५ ऑगस्ट १९६० रोजी स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्याच्या अगोदर हा देश फ्रान्सच्या अखत्यारित होता. फलबर्ट यूलो रिपब्लिक ऑफ कोंगो हे या देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत.
बहरीन - हा देश १५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटनपासून स्वातंत्र्य झालेला आहे. बहरिन हा देश १६ डिसेंबर रोजी 'नॅशनल डे' म्हणून साजरा करत असते. कारण याच दिवशी पूर्व शासक बनलेले इसा बिन सलमान अल खलीफा हे राज्यगादीवर बसले होते.
कोरिया - दुसऱ्या विश्वयुद्धाच्या समाप्तीपर्यंत कोरिया जपानकडे होता. जपानने सरेंडर केल्यानंतर कोरियाला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर कोरिया, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन भागात विभागले गेले. उत्तर कोरिया सोवियत संघाच्या ट्रस्टींच्या अंतर्गत आला. आणि १५ ऑगस्ट १८४८ रोजी उत्तर कोरिया डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया' च्या अंतर्गत देश स्वातंत्र्य झाला.
दक्षिण कोरिया - अमेरिका आणि सोवियत संघ या अधिकृत क्षेत्रांच्या एकीकरणानंतर दक्षिण कोरियाला १५ ऑगस्ट १९४८ रोजी 'रिपब्लिक ऑफ कोरिया' बनलं आणि देशात अमेरिकेकडे झुकणारी सरकार आलं.
लिकटेंस्टाइन - १९४० पासून १५ ऑगस्ट हा दिवस नॅशनल डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस त्या दिवसाच्या प्रिंस, प्रिंस फ्रांज जोसेफ द्वितीय याच्या वाढदिवसाच्या अगदी आदल्या दिवशी येतो. १९८९ मध्ये प्रिंस फ्रांज जोसेफ द्वितीयच्या मृत्यूनंतरही लिक १५ ऑगस्ट हा दिवस नॅशनल डे म्हणून साजरे करतात.