'या' शास्त्रज्ञांना मिळाला यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नोबेल पारितोषकाच्या घोषणेला आजपासून सुरूवात झाली.

Updated: Oct 1, 2018, 05:02 PM IST
'या' शास्त्रज्ञांना मिळाला यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार title=

नवी दिल्ली: यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी जेम्स अॅलिसन आणि सुकु होंजो या दोन शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. स्वीडनच्या स्टॉकहोममधून नोबेल पारितोषकाच्या घोषणेला आजपासून सुरूवात झाली. या दोन शास्त्रज्ञांनी कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या निगेटिव्ह इम्यून रेग्यूलेशनच तंत्रज्ञान विकसित करण्यात या दोन्ही शास्त्रज्ञांचा मोठा वाटा होता. त्याबद्दलच दोघांनाही नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

BREAKING NEWS
The 2018 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded jointly to James P. Allison and Tasuku Honjo “for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation.” pic.twitter.com/gk69W1ZLNI
— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018

दरम्यान, यंदा नोबेल शांती पुरस्कार कोणाला मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या पुरस्कारासाठी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांचे नाव आघाडीवर आहे. देशांतर्गत राजकीय विरोध न जुमानता मर्कल यांनी २०१५मध्ये उत्तर आफ्रिका, प्रमुख्यानं सीरियातून येणाऱ्या शरणार्थींना जर्मनीत आश्रय दिला होता.