नवी दिल्ली : कॅनडातील एटमॉनटॉनमध्ये शनिवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५ जण जखमी झाले आहेत.
कॅनडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा फुटबॉल लीग दरम्यान ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला भरधाव वेगाने आलेल्या गाडीने धडक दिली. धडक दिल्यानंतर आरोपीने चाकूने हल्लाही केला आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या चौघांनाही धडक दिली.
आरोपी चालवत असलेल्या गाडीवर आयसीसचा झेंडा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करत त्याला अटक केली.
अॅडमॉनटॉन पोलीस सर्व्हिसचे चीफ रॉड नेचट यांनी सांगितले की, अलबर्टाच्या कॉमनवेल्थ स्टेडिअम बाहेर ट्रॅफिक पोलीस आणि त्यांच्या गाडीला स्थानिक वेळेनुसार, रात्री ८ वाजुन १५ मिनिटांनी धडक दिली. त्यानंतर आरोपीने चाकूने हल्ला केला.