न्यूयॉर्क : अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. न्युयॉर्कच्या लोअर मॅनहटनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरिअलजवळ एका ट्रकने रस्त्याने चालत असलेल्या नागरिकांना चिरडले.
यात ८ लोकांचा मॄत्यू झाल्याचे वॄत्त आहे. तर अनेकजण जखमी झाल्याचे समजते. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा दहशतवादी हा २९ वर्षांचा आहे. हल्ला केल्यानंतर तो पळून जात असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, हल्लेखोराजवळ एक नकली बंदुक आणि एक पॅलेट गन आढळली. काही प्रत्यक्षदर्शींनी फायरिंगचा आवाज ऎकल्याचेही सांगितले.
8 dead on bike path near World Trade Center in 'an act of terror' aimed at civilians says New York Mayor pic.twitter.com/IbtusvpNiZ
— ANI (@ANI) October 31, 2017
अमेरिकेतील या हल्ल्यात कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. याआधी आयएस या दहशतवादी संघटनेने ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये हल्ला केला होता. मात्र हा हल्ला आयसीसने केला की नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये.
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, ‘बस्स...आता खूप झाले. आयएसला मिडिल ईस्ट आणि प्रत्येक ठिकाणी हरवल्यानंतर आता त्यांना अमेरिकेत घुसखोरी करू देणार नाही. या हल्ल्यातील पीडितांच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि संपूर्ण अमेरिका त्यांच्यासोबत आहे’.