टोकियो : अण्वस्त्रे हा आपला अविभाज्य घटक असल्याचे ठासून सांगणाऱ्या उत्तर कोरियाला मोठा झटका बसला आहे. अण्वस्त्राची चाचणी करताना झालेल्या स्फोटात तब्बल २०० लोक ठार झाल्याचे वृत्त आहे.
जपानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ३ डिसेंबर रोजी उत्तर कोरियाने आपली सहावी आणि सर्वात मोठी अंडरग्राऊंड न्यूक्लिअर टेस्ट केली. त्यानंतर काही दिवसांतच घडलेल्या स्फोटात इतके लोक इतके लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. ही घटना घडल्यावर प्रदीर्घ काळानंतर ही घटना पुढे आली आहे.
जपानी टीव्ही चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात दावा केला आहे की, सुरूवातील १०० कामगार घटनास्थळी अडकले होते. त्यांचे मदत आणि बचाव कार्य सुरू होते. दरम्यान, सुरूंग पेरलेल्या भागात जोरदार स्फोट झाला. अण्वस्त्रांच्या अभ्यासकांनी इशाराही दिला होता की, अंडरग्रांऊंड टेस्ट केल्यामुळे पर्वतही कोसळू शकतो. तसेच, चीनच्या सीमेजवळ रेडिएशनही लीक होऊ शकतात.
या स्थळावरून उत्तर कोरियाने आतापर्यंत २००६ ते आता पर्यंत ६ वेळा अण्वस्त्र चाचणी केली आहे. ३ डिसेंबरला केलेल्या ६ व्या चाचणीच्या एक दिवसानंतर उपग्रहांनी टीपलेल्या छायाचित्रात स्फोट आणि भूकंपाची नोंद झाल्याचा उल्लेख आहे. हा स्फोट झाल्यावर ६.३ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. त्यानंतर पुन्हा ४.१ रिष्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.
जपानी मीडियाने दिलेल्या वृत्तात, उत्तर कोरियाने ३ डिसेंबरला ज्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली त्याची तीव्रता १९४५ मध्ये हिरोशिमावर टाकलेल्या अण्वस्त्रापेक्षा ८ पटींनी अधिक होती. या चाचणीनंतर जमीन खचली आणि काही ठिकाणी ध्वस्तही झाली.
उत्तर कोरियाने मात्र असे काही घडलेच नाही, असे म्हणत कानावर हात ठेवले आहेत.