काबूल : Situation in Afghanistan : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर अमेरिकन (US Army) सैन्याने देश पूर्णपणे सोडला आहे. 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले आणि शेवटचे सैन्य अफगाणिस्तानातून (Afghanistan) सोमवारी रात्री 12 वाजता निघाले. यानंतर तालिबानने (Taliban) काबूल विमानतळावर (Kabul Airport0 पूर्णपणे कब्जा केला आणि आता अमेरिकेने (USA) अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी काबूल विमानतळावर पत्रकार परिषद घेतली आणि अमेरिकेबरोबरच्या राजनैतिक संबंधांबद्दलही बोलले. प्रवक्ते म्हणाले की अमेरिकन सैन्य (US Army) माघार हा आपल्या सर्वांचा विजय आहे. तालिबानला अमेरिकेबरोबर चांगले राजनैतिक संबंध हवे आहेत. अधिक वाचा - अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर पडताच तालिबानचा गोळीबार आणि आतिशबाजीने जल्लोष
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी अमेरिकन सैन्याच्या माघारीचा संबंध अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याशी जोडला आणि सांगितले की, आज देश पूर्णपणे स्वतंत्र झाला, पण यानंतर जेव्हा काबूल विमानतळ तालिबान्यांनी पूर्णपणे काबीज केले तेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी एक भीतीदायक उत्सव साजरा केला. दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला आणि आकाशात अनेक रॉकेट डागले. तालिबानच्या या गोळीबाराने काबूलचे स्थानिक लोक भयभीत झाले होते. तालिबानने त्यांना सांगितले की हा हल्ला नाही, पण अमेरिका गेल्यानंतर उत्सवात गोळीबार केला जात होता.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी एक मोठे वक्तव्य केले आणि सांगितले की, अफगाणिस्तानातील अमेरिकेची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपली. बायडेन म्हणाले, 'गेल्या 17 दिवसात आमच्या सैनिकांनी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी विमान वाहतूक केली आहे. त्यांनी ते अतुलनीय धैर्य आणि निर्धाराने केले आहे. आता अफगाणिस्तानात आमची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपली आहे.