तालिबानकडून चीनविषयी धक्कादायक वक्तव्य, भारताची चिंता वाढली

तालिबानने चीनविषयी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे, यामुळे आपोआपचं भारताची चिंता वाढली आहे. 

Updated: Sep 3, 2021, 08:30 PM IST
 तालिबानकडून चीनविषयी धक्कादायक वक्तव्य, भारताची चिंता वाढली title=

काबूल : तालिबानने चीनविषयी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे, यामुळे आपोआपचं भारताची चिंता वाढली आहे. तालिबानचा प्रवक्ता Zabihullah Mujahid याने चीन हा तालिबानचा सर्वात मोठा मित्र असल्याचं म्हटलं आहे. हा आमच्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे. चीन आमच्या देशात गुंतवणूक करुन देशाला पुन्हा उभं करेल, असा विश्वास तालिबानने व्यक्त केला आहे. जवळजवळ उद्धवस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अफगाणिस्तानची जबाबदारी तालिबान चीनवर सोडणार असल्याचं दिसून येत आहे.

यावर एक तर्क देखील व्यक्त करण्यात आला आहे, अफगाणिस्तानकडे खनिज संपत्तीत तांबे सर्वात जास्त आहे, अफगाणिस्तानातील तांब्याच्या खाणींना चीनने पुन्हा सक्रीय केल्यास, आणि काळाचा पाठलाग करत या खाणी चीन मॉर्डन करुन अफगाणिस्तानला सोपवेल अशी आशा तालिबानला आहे. हे अफगाणिस्तानसाठी फायद्याचं असेल असं तालिबानने म्हटलं आहे.

येणाऱ्या काळात अफगाणिस्तान आणि चीनमध्ये मैत्री दिसणार आहे, त्यामुळे अनेक घटनांमुळे भारताची चिंता वाढणार आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान चीनकडे मदतीची आस लावून बसला आहे. दुसरीकडे भारताने चीनच्या ज्या प्रकल्पांना विरोध केला आहे, त्या प्रकल्पांचं तालिबान समर्थन करताना दिसत आहे.

चीनचं तालिबान ज्या प्रकारे समर्थन करताना दिसत आहे, यावरुन चीन आणि तालिबानने ही तयारी याआधीच सुरु केली असावी. दुसरीकडे चीनने अस म्हटलं आहे की, तालिबान अफगाणिस्तानच्या जमीनीचा वापर अतिरेकी तयार करण्यासाठी होवू देणार नाही असा विश्वास आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांची आम्हाला चिंता आहे, तालिबान काय करतंय हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही चीनने म्हटलं आहे.

चीनने यापूर्वीच आपण अफगाणिस्तानला आर्थिक मदत करणार असल्याचं म्हटलं आहे, तर अमेरिकेला मुख्य गुन्हेगार ठरवलं आहे. चीन तालिबानच्या माध्यमातून अफगाणिस्तानला एक बाजारपेठ म्हणून भविष्यात पाहत आहे.