नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या भविष्याची राखरांगोळी करणाऱ्या तालिबाननं (TALIBAN) एकच धुमाकूळ घातला आहे. देशातील नागरिकांवर चिंतेची लाट दिसत आहे, तर अनेकांनीच देशाच्या बाहेरची वाट धरली आहे. रविवारी तालिबाननं काबुलवर ताबा मिळवला आणि साऱ्या जगालाच हादरा मिळाला. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी देश सोडल्यानंतर तालिबान्यांनी हे कृत्य केलं.
तालिबान कोण आहे? अफगाणिस्तानमध्ये सरकारला झुकावणाऱ्या तालिबानचे मुख्य नेते कोण?
दरम्यान, यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा पाडाव झाल्यानंतर काबुलमध्ये असणाऱ्या अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीभवनात घुसखोरी केली आणि तिथं चहापानाचा कार्यक्रम केला. तालिबानच्या या टी पार्टीला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मोठ्या वेगानं व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तालिबानी तिथे असणाऱ्या सोफ्यावर, मखमली गालिचांवर बसून चहा पिताना दिसत आहेत.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार तालिबाननं Mazar-i-sharif येथे असणाऱ्या General Dostum’s house ताबा मिळवला, त्यावेळी तिथं कोणत्यही प्रकारे त्यांचा विरोध करण्यात आला नाही, ही धक्कादायक दृश्य जगासमोर आली.
#Taliban inside General Dostum’s house.-1/2 pic.twitter.com/nNCmzvRsXu
— (@yayasser227) August 14, 2021
Taliban having a Tea Party inside General Dostum’s house build on US Tax Dollars
— Vengeance Is Mine! (@PromoterBoxing) August 14, 2021
दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, अतिरेकी संघटना अफगाणिस्तानमध्ये खुले, सर्वसमावेशक इस्लामी सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने चर्चा करत आहे. आता सर्वच देशात तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्या तिल या परिस्थितीबद्दल चर्चा सुरू आहे.