भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून 'त्या' चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल

Taiwan Earthquake Nurse Video: तैवानमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपामुळं जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 4, 2024, 07:32 PM IST
भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून 'त्या' चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल title=
taiwan earthquake Nurse CCTV footage hospital protects infants

Taiwan Earthquake Nurse Video: अलीकडेच तैवान भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तैवानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. तैवानच्या भूकंपानंतर रुग्णालयातील नर्स नवजात मुलांना वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पुढे येणाऱ्या या नर्सच्या टिमचे कौतुक होताना दिसत आहे. 

तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आपल्या प्राणाची चिंता न करता एका नर्सच्या टीमने लगेचच अॅक्टिव्ह होत नवजात बालकांच्या प्राणांची रक्षा केली आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने या व्हिडिओचे एक फुटेज दिले आहे. या नर्सने तिचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. भूकंपानंतर जमिनीचा हादला बसल्यानंतर नर्स बाळांच्या पाळणे मधोमध आणून ठेवत आहेत. तसंच, काही जणांच्या पाळणे हट्ट पकडून ठेवले आहेत. जवळपास 10 नवजात बाळांना तीन नर्संनी सांभाळले आहे. 

हसिनचु येथील पोस्टमार्टम केअर होमने देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात दिसत आहे की, नर्स नवजात बालकांच्या रक्षणासाठी असंच पाऊलं उचलताना दिसत आहेत. व्हिडिओत भूकंपादरम्यान होणाऱ्या सर्व गरजेच्या सुरक्षित उपायांबाबतही सांगण्यात आले आहे. केअर होमने म्हटलं आहे की, भूंकप आल्यानंतर सर्व नर्सने नवजात बाळांच्या पाळण्यांना खिडकी आणि कपाटापासून दूर न्यायचे असते. तसंच, पाळणे जास्त हलण्यापासून रोखायचे होते. 

इंटरनेटवर हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नर्सेसने मोठ्या हिमतीने आणि शांत डोक्याने परिस्थिती सांभाळल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. स्वतःच्या जीवावर उदार होऊन नवजात बालकांना वाचवणाऱ्या या नर्सेसला अनेकांनी धन्यवाद दिले आहेत.

दरम्यान, बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील किनारी भागात 7.4 तीव्रतेचा भूकंप आला होता. या विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत 9 जणांची मृत्यू झाला आहे तर, 1 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तैवानमध्ये मागच्या 25 वर्षांतील सर्वात विनाशकारी भूकंप आला होता. याआधी 1999मध्ये नान्टो परिसरात 7.2 तीव्रतेचा भूकंप आला होता. यात 2,500 पेक्षा जास्त लोकांचा 1,300 हून अधिक लोक जखमी झाले होते. बुधवारी आलेल्या भूकंप सकाळी 8 वाजण्याच्या आधी आला होता. डोंगरभागात असलेल्या हुआलियन जिल्ह्याच्या समुद्री किनाऱ्याजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता.  जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा लोक ऑफिसला व शाळेत जाण्याची तयारी करत होते.