LIVE कॅमेऱ्यासमोर महिला खासदाराचं धक्कादायक कृत्य, पाहा नेमकं काय केलं?

महिला खासदाराने LIVE कॅमेऱ्यासमोर असं काही केलं की...

Updated: Oct 5, 2022, 11:37 PM IST
LIVE कॅमेऱ्यासमोर महिला खासदाराचं धक्कादायक कृत्य, पाहा नेमकं काय केलं? title=

Iran Protests Video: इराणमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर निदर्शने होताना दिसत आहेत. महिलांच्या पेहराव आणि कपड्यांबाबत (Hijab Row) इराणमध्ये होणारा निदर्शनांकडे (Protest) संपूर्ण जगचं लक्ष आहे. बहुतेक देश इराणी महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. अशातच युरोपियन संसदेत एका महिला खासदाराने चक्क LIVE कॅमेऱ्यासमोर कात्रीने केस कापली आहेत.

महिलांच्या पेहराव आणि कपड्यांबाबत इराणमध्ये होणाऱ्या (Iran in Protest) प्रदर्शनाला जगभरातून प्रतिसाद मिळताना दिसतोय. जगभरातील महिला नेत्यांनी स्वत:ची केस कापून इराणमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला समर्थन केलं आहे. युरोपियन संसद सदस्यांनी इराणी महिलांसोबत एकता दर्शविली. स्वीडिश राजकारणी असलेल्या अबीर अल सहलानी (Abir Al-Sahlani) यांनी स्ट्रासबर्गमध्ये EU चर्चेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आपली केसं कापली.

युरोपियन युनियनचे (EU) लोक आणि इराणी नागरिक इराणमधील स्त्री-पुरुषांवरील सर्व हिंसाचार बिनशर्त आणि त्वरित बंद करण्याची मागणी करत आहेत. इराणच्या महिलांची सुटका होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, असं अबीर अल सहलानी यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी कात्री हातात घेत, स्वत:ची केस कापली.

दरम्यान, हिजाबला विरोध करणाऱ्या महसा अमिनीचा (Mahsa Amini Death) पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमधील परिस्थिती पूर्णपणे बदलली. यावेळी इराण हिंसाचाराच्या आगीत जळत असल्याचं पहायला मिळतंय. आत्तापर्यंत किमान 92 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जगभरातून इराणी महिलांच्या फ्रिडमसाठी मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसत आहे.

आणखी वाचा- गरब्याच्या तालावर थिरकली अमेरिकेतील सिऍटल नागरी!