91 देशांचा प्रवास, दीड कोटी खर्च... त्यानंतर 'या' देशात सापडलं जगातील सर्वात घाणेरडं शौचालय

जगातील सर्वात घाणेरडं शौचालय कोणत्या देशात आहे? त्याने घेतला शोध  

Updated: Oct 5, 2022, 10:01 PM IST
91 देशांचा प्रवास, दीड कोटी खर्च... त्यानंतर 'या' देशात सापडलं जगातील सर्वात घाणेरडं शौचालय title=

Ajab Gajab News: अनेकांना जगभ्रमंतीचा छंद असतो. विविध देशात जाऊन तिथली संस्कृती, तिथले खाद्यपदार्थ, तिथला पेहराव जाणून घेण्याची आवड असते. यासाठी करोडो रुपये खर्च करुन ते जगभरातील विविध देशांची भटकंती करतात. पण एका व्यक्तीने एका वेगळ्याच कारणासाठी जगभ्रमंती केली. जगातील सर्वात घाणेरडं शौचालय कोणत्या देशात आहे याचा शोध या व्यक्तीने घेतला. यासाठी त्याने तब्बल 91 देश पालथे घातले, आणि कोट्यवधी रुपये खर्च केले.

जगातली सर्वात खराब शौचालयाचा शोध घेणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे ग्राहम, तो एक ब्रिटिश ब्लॉगर आहे. त्याने 91 देश म्हणजे जवळपस 1.2 लाख किलोमीटर प्रवास केला. यासाठी त्याने 150,000 पाऊंड म्हणजे 1.3 कोटी रुपये खर्च केला. इतका खर्च करुन विविध देशातील शौचालयांची माहिती त्याने गोळा केली. शौचालयासाठीच्या सुविधा, त्यांची स्वच्छता याबाबत त्याने माहिती घेतली.

'या' देशात सापडलं सर्वात घाणेरडं शौचालय
91 देशांचा प्रवास केल्यानंतर सर्वात घाणेरडं शौचालय कोणत्या देशात आढळलं याची माहिती त्याने दिली आहे. तजाकिस्तानमध्ये जगातील सर्वात घाणेरडं शौचालय त्याला आढळलं. त्याने म्हटलंय, हे शौचालय इतकं घाणेरडं आहे की ते बघून उल्टी येऊ शकते. इथे लोकं वाळलेल्या शौचावरुन चालत जातात, सर्वात धक्कादायक म्हणजे शौचालय झाकण्यासाठी फाटलेल्या कपड्यांचा वापर केला जातो, असं ग्राहम यांनी म्हटलं आहे. 

'टॉयलेट्स ऑफ द वाइल्ड फ्रंटियर' या आपल्या पुस्तकात ग्राहम यांनी आपले अनुभव लिहिले आहेत.  घाणेरड्या शौचालयांच्या यादीत जगातील 36 शौचालयांचा समावेश त्यांनी केला आहे. यात चीन आणि बांगलादेशमधील प्रत्येकी एक सार्वजनिक शौचालय आहे. ग्राहम यांनी केला हा शोध विचित्र वाटत असला तरी त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. सत्य जाणून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.