टोकिओ : Strongest Global Storm: दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या जपान आणि चीनसाठी आणखी एक मोठे संकट येऊ घातले आहे. ( Strongest Storm) 2022 च्या सर्वात मोठ्या जागतिक वादळामुळे या दोन देशांच्या चिंता वाढल्या आहेत, जे पूर्व चीन समुद्र ओलांडून जपानच्या दक्षिणेकडील बेटांना धोक्यात आणू शकतात.
यूएस जॉइंट टायफून इशारा केंद्रानुसार, सुपर टायफून हिमनोर सध्या सुमारे 160 मैल (257 किमी) प्रति तास वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा कमाल वेग 195 मैल प्रतितास नोंदवण्यात आला आहे. यामुळे, लाटेची उंची कमाल 50 फूट (15 मीटर) पर्यंत नोंदवली गेली आहे.
जपानच्या हवामान संस्थेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या या वादळाच्या वेगाच्या आधारे हिनमनोर हे 2022 मधील सर्वात मोठे आणि खतरनाक वादळ असेल. हाँगकाँग वेधशाळेने सांगितले की हे वादळ सकाळी 10 वाजता ओकिनावा, जपानपासून 230 किलोमीटर पूर्वेकडे केंद्रित होते आणि ते पश्चिम-नैऋत्येला रयूकू बेटाच्या दिशेने सुमारे 22 किलोमीटर प्रति तास वेगाने सरकण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, यूएस JTWC ने अंदाज व्यक्त केला आहे की सुपर टायफून वादळ येत्या काही दिवसांत कमी होण्याचा अंदाज आहे. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या हंगामी वादळाच्या अंदाजाचे प्रमुख लेखक फिल क्लोत्झबॅक यांनी सांगितले की, आम्ही समुद्रातील हालचालीबाबतच्या नोंदी तपशीलवार ठेवतो. ऑगस्टमध्ये सात दशकांहून अधिक काळात केवळ दोनदा चक्रीवादळ आले आहे. पहिले वादळ 1961 मध्ये आणि दुसरे 1997 मध्ये आले होते, परंतु या दोन्ही वादळाचा वेग यावेळच्या वादळासारखा नव्हता.