पीएम मोदींचा जॅकेट घालून कार्यालयात जातात या देशाचे राष्ट्राध्यक्ष

मोदी जॅकेटची परदेशातही जादू कायम

Updated: Oct 31, 2018, 03:55 PM IST
पीएम मोदींचा जॅकेट घालून कार्यालयात जातात या देशाचे राष्ट्राध्यक्ष title=

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जॅकेट देशात तर प्रसिद्ध आहेच पण देशाबाहेरही त्याला तेवढीच पसंती आहे. आता तर दुसऱ्या देशाचे प्रमुख देखील मोदी जॅकेट घालू लागले आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे यांना देखील पंतप्रधान मोदींच्या जॅकेटने आकर्षित केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ही त्यांना यामुळे असे अनेक जॅकेट गिफ्ट केले आहेत. याबद्दल राष्ट्राध्यक्ष मून जे यांनी ट्विट करत मोदींचे आभार मानले आहेत.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राअध्यक्ष मून जे यांनी ट्विट केलं आहे की, 'मी जेव्हा भारताच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा पंतप्रधान मोदींना म्हटलं होतं की तुमचं जॅकेट खूप छान वाटतं. त्य़ाच दरम्यान त्यांनी माझं माप घेतलं. पंतप्रधान मोदींनी ही गोष्ट लक्षात ठेवत माझ्यासाठी जॅकेट पाठवले आहेत.'

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षांनी पीएम मोदींनी पाठवलेले जॅकेट घालून एक फोटो शेअर केला आहे. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मोदी जॅकेट घालून आता त्यांच्या ऑफीस जातात. याच वर्षी जुलै महिन्यात ते भारतात आले होते. आता पुन्हा एकदा दिवाळीच्या दरम्यान ते भारतात येणार आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी आपल्या पेहरावामुळे चर्चेत असतात. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन करताना देखील ते कोणता ड्रेस आणि फेटा घालतात याची देखील उत्सूकता अनेकांना असते. पीएम मोदी नॉर्थ ईस्ट, हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जातात तेव्हा तेथील पारंपरिक वेश-भूषा देखील करतात. विरोधक मात्र या मुद्द्यावर मोदींवर सूट-बूटचं सरकार असल्य़ाची टीका करत असते.