या देशाने छापली 10 लाख रुपयांची नोट, एवढ्या पैशात येथे अर्धा लिटर पेट्रोल मिळणार नाही!

 दक्षिण अमेरिकेतील एका देशाने चक्क 10 लाख रुपयांची नोट छापली आहे.  

Updated: Mar 7, 2021, 02:11 PM IST
या देशाने छापली 10 लाख रुपयांची नोट, एवढ्या पैशात येथे अर्धा लिटर पेट्रोल मिळणार नाही!  title=

मुंबई : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाने (Venezuela)10 लाख रुपयांची नोट छापली आहे. इतक्या मोठ्या रकमेची नोट तयार करणारा व्हेनेझुएला हा पहिला देश आहे. 10 लाखांच्या (1 million) या बोलिवर नोटेची किंमत भारतात 36 रूपये असून, दक्षिण अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी 10 लाखांची नोट (1 million bolivars) छापण्यात आली आहे. मात्र, भारतात पेट्रोलचे दर शंभरीकडे झुकले आहेत. त्यामुळे या नोटेचा विचार केल्यास येथे अर्धा लिटर पेट्रोलही मिळणार नाही. (The South African country Venezuela has issued a new currency note of 1 million bolivars)

दक्षिण अफ्रीकी देश व्हेनेझुएला आर्थिक संकटात आहे. यातून सावरण्यासाठी 10 लाख रुपयांची नोट बाजारात आणली आहे. मात्र, जागतिकरणाचा विचार केल्यास या नोटेची किंमत अन्य देशांच्या तुलनेत नगण्य आहे. 10 लाख बोलिवरची किंमत अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय रुपयानुसार केवळ 36 रुपये आहे. याचा विचार केला तर भारतात साधे अर्धा लिटर पेट्रोलही मिळणार नाही. एवढे या 10 लाख रुपयांच्या नोटेचे मूल्य आहे. 

व्हेनेझुएलात भुखेमुळे लोकांचा मृत्यू

व्हेनेझुएलात परिस्थिती खूप हालाक्याची झाली आहे. आर्थिक परिस्थिती एकदम बिकट झाली आहे. लोकांचा भुखेमुळे मृत्यू होत आहे. येथील नागरिकांना अनेक वस्तूच मिळत नाहीत. अनेक लोक उपाशीपोटीच राहतात. यातच त्यांचा मृत्यू होत आहे. Venezuela मध्ये रुपयांचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरलेले आहे. याचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोक पोते भरुन पैसे घेऊन जात आहेत. व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेने सांगितले की, देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहिल्यावर मोठ्या किंमतीच्या नोटा छापाव्या लागल्या आहेत. 

दोन आणि पाच लाख रुपयांची नोट छापणार

पुढील आठवड्यात 2 लाख बोलिवर आणि 5 लाख बोलिवरच्या नोटा जारी करण्यात येणार आहेत. भविष्यात व्हेनेझुएलामध्ये 10 हजार, 20 हजार आणि 50 हजार बोलिवरच्या नोटा चलनात आणण्याच्या विचारात आहे. व्हेनेझुएलात 10 लाख बोलिवरची नोट आता सर्वाधिक मूल्याची नोट बनली आहे. मात्र, या नोटाची किंमत अर्धा यूएस डॉलर आहे. विशेष बाब म्हणजे एवढ्या रुपयांत फक्त 2 किलो बटाटे किंवा अर्धा किलो तांदूळ मिळू शकतात. तिथल्या सरकारने लोकांना सवलत देण्यासाठी मोठ्या मूल्याच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांना पोत्यातून पैसे घेवून जावे लागणार नाही. नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही नोट छापण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.