पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर हल्ला, मुलतान जिल्ह्यात 5 जणांची गळा चिरुन हत्या

पाकिस्तानमध्ये (Pakistan) अल्पसंख्याक हिंदू (Hindu) कुटुंबीयांच्या सामूहिक हत्येचा ( Mass Murder) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

Updated: Mar 7, 2021, 08:47 AM IST
पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर हल्ला, मुलतान जिल्ह्यात 5 जणांची गळा चिरुन हत्या title=

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) अल्पसंख्याक हिंदू (Hindu) कुटुंबीयांच्या सामूहिक हत्येचा ( Mass Murder) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी एकाच कुटुंबातील 5 जणांना धारदार शस्त्राने गळा घोटला आहे. कुऱ्हाडीचे घाव घालून ही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांमध्ये भीती पसरली आहे. ( mass murder of minority Hindus has come to light in Pakistan.)

रहीम यार खान शहरातील घटना

'द न्यूज इंटरनॅशनल'च्या वृत्तानुसार, ही घटना पाकिस्तानच्या मुलतान (Multan) जिल्ह्यातील रहीम यार खान शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर अबू धाबी कॉलनीच्या चक क्रमांक 135-पी येथे घडली. टेलर काम करणारे 36 वर्षीय राम चंद मेघवाल, त्यांची पत्नी आणि मुले यांचे मृतदेह  शनिवारी सकाळी त्यांच्या घरात सापडले. मारेकर्‍यांनी काल रात्री धारधार शस्त्राने पाच जणांचा गळा कापला होता. पोलिसांनी घरातून रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणि चाकू जप्त केला आहे. पोलिसांनी म्हटले आहे, या शस्त्राद्वारे हे हत्याकांड घडवून आणले गेले.

अल्पसंख्याक हिंदू-शीखांमध्ये भीती वाढली

रहिम यार खान येथील समाजसेवक बीरबल दास यांनी सांगितले की, मृत राम चंद मेघवाल हे दीर्घ काळापासून टेलरचे दुकान चालवत होते. तो खूप शांतताप्रिय व्यक्ती होते आणि आनंदी आयुष्य जगत होते. ते म्हणाले की या सनसनाटी घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे शहरात राहणा हिंदू-शीखांमध्ये भीती वाढली आहे. दुसरीकडे या घटनेनंतर पाकिस्तानी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी दोषींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

1947 पासून हिंदू-शीख यांचा छळ 

पाकिस्तानमध्ये (Pakistan) 1947 पासून अल्पसंख्याक हिंदू आणि शीख (Hindu-Sikh) यांचा छळ सुरू आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यात भाग पाडले जात आहे. त्यानंतर मुस्लिम तरुणांसह त्यांचे लग्न जबरदस्तीने करण्यात येते. हिंदू-शीख या विषयावर बर्‍याच काळापासून आवाज उठवत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांच्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.