Video: सापानं सापालाच जिवंत गिळलं! व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणी, पक्ष्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते.

Updated: Oct 10, 2022, 01:43 PM IST
Video: सापानं सापालाच जिवंत गिळलं! व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा title=

Snake Swallowed Other Snake Alive Viral Video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणी, पक्ष्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. सापाचा व्हिडीओ म्हटलं की जीव की प्राण असतो. कारण सापाच्या दुनियेबाबत कायम कुतुहूल असतं. असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडीओत एक साप दुसऱ्या सापाला गिळताना (Snake) दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाइल्ड अॅनिमल पिक्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर 1 लाख 29 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. लाल रंगाचं तोंड असलेला साप दुसऱ्या सापाला काही क्षणातच गिळतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओखाली नेटकरी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'खरंच मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. व्हिडीओ पाहताना अंगावर काटा आला.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, 'नूडल्स खाल्ल्यासारखं साप गिळाला. इतक्या फास्ट मी नूडल्स पण खात नाही'