थायलंडमध्ये शाळेवर अंदाधुंद गोळीबार; लहान मुलांसह 34 जणांचा मृत्यू

हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडल्याची माहिती समोर

Updated: Oct 6, 2022, 02:47 PM IST
थायलंडमध्ये शाळेवर अंदाधुंद गोळीबार; लहान मुलांसह 34 जणांचा मृत्यू  title=
(फोटो सौजन्य - ANI)

Thailand Shooting : थायलंडच्या (thailand) ईशान्य प्रांतात झालेल्या गोळीबारात (thailand) 34 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 23 मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. लहान मुलांच्या डे केअर सेंटरवर (day care centre) झालेल्या या हल्ल्याने लोकांना हादरवून सोडलंय. हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांची घबराट पसरली आहे. यानंतर संपूर्ण थायलंडमध्ये (thailand) शोककळा पसरली आहे. आरोपी हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडली आहे. यादरम्यान आरोपीचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये 24 मुले आणि त्यांच्या दोन शिक्षकांचा समावेश आहे.

या हल्लेखोराची ओळख पटली असून आरोपी हा माजी पोलीस अधिकारी असल्याचे समोर आलं आहे. 34 वर्षीय आरोपीचे वय नाव पन्या खमरब (Panya Khamrab) असल्याची माहिती समोर आली.

हल्लेखोराने लहान मुलांवरही चाकूने हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये बहुतांश मुले आहेत. पोलिसांचे म्हणण्यानुसार, हल्लेखोर बँकॉक सारखीच नंबर प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टोयोटा गाडीतून आला होता. याआधीही थायलंडमध्ये एका सैनिकाने नाखोन रत्चासिमा सिटीमध्ये 21 लोकांना लक्ष्य केले होते.

माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्लेखोराने पत्नी आणि मुलावरही गोळ्या झाडल्या आहेत. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडली. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर नोंग बुआ लानफू प्रांतात लष्कराला सतर्क करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे.