सिंगापूर : स्वत:च्या पत्नीवर बलात्कार करण्याचा कट रचल्याप्रकरणी एका व्यक्तीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वास्तविक, या माणसाला आपल्या खासगी आयुष्याबद्दल एक फॅन्टसी होती. ज्यामध्ये त्याला पत्नीशी शारीरीक संबंध ठेवताना एक प्रयोग करुन पाहायचा होता. यासाठी त्याने आपल्या मित्राला घरी आणले आणि त्याला आपल्या बायकोसोबत संबंध ठेवण्याची ऑफर दिली. आपला नवरा आपल्यावर बलात्कार करू इच्छितो हे पीडितेला माहीत नव्हते.
'स्ट्रेट्स टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण सिंगापूरचे आहे. या जोडप्याचे लग्न होऊन 23 वर्षे झाली आणि त्यांना तीन मुलेही आहेत, मात्र असे असतानाही पतीने आपल्या लहरीपणामुळे सर्व काही उद्ध्वस्त केले. त्याने मित्रासोबत मिळून आपल्याच पत्नीवर बलात्कार करण्याचा कट रचला.
हा सनकी नवरा बराच वेळ योग्य संधी शोधत राहिला, त्यानंतर दोन वर्षांनी संधी आल्यावर 48 वर्षीय पतीने आपल्या 45 वर्षीय जोडीदाराला घरी बोलावले.
या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या दारूमध्ये आधीच नशेचे औषध मिसळले होते. नवरा आणि त्याचा मित्र दोघे जेव्हा बेडरूममध्ये आले, तेव्हा मित्रानं पाहिलं की ती महिला डोळ्यावर पट्टी बांधून बेशुद्ध पडली होती. मात्र, जेव्हा या अज्ञात व्यक्ती महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेला शुद्धीवर आली. जे पाहून तो व्यक्ती घाबरून तेथून पळू गेला.
संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली. गुरुवारी सिंगापूर उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने पीडितेच्या पतीला आणि त्याच्या मित्राला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
रिपोर्टनुसार, महिलेचा पती आणि दुसरी व्यक्ती 2015 मध्ये सहकारी बनले. पती त्याच्या लैंगिक जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी त्याच्या सहकाऱ्यासोबत शेअर करत असे. त्याने सांगितले की त्याला दुसऱ्या पुरुषाने आपल्या पत्नीसोबत सेक्स करताना पाहायचे आहे. पतीने आपल्या सहकर्मचाऱ्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले आणि 31 डिसेंबर 2017 रोजी त्याला आपल्या घरी बोलावले.
पहिले पतीने बेशुद्ध पत्नीसोबत सेक्स केलं. त्यानंतर पतीने मित्राला पत्नीकडे जाण्याचा इशारा केला. यादरम्यान महिलेची मुले आणि मोलकरीण घराच्या दुसऱ्या भागात झोपले होते.
अनोळखी व्यक्ती तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच महिलेला शुद्ध आली आणि तिने डोळ्याची पट्टी काढण्याचा प्रयत्न केला.
हे पाहून तो माणूस पळून गेला. नंतर असे आढळून आले की, त्या व्यक्तीला इरेक्टाइल डिसफंक्शन होते. कसेबसे महिलेने तो माणूस शोधून काढला आणि तिचा नवरा आणि त्याच्या मित्राला कबुली पत्र लिहायला लावले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि आता आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.