राणी एलिझाबेथ पेक्षा शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा खर्च, आकडा ऐकून धक्काच बसेल

शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारावर मोठा खर्च केला जात आहे. त्यावरुन देशात देखील 2 मतप्रवाह तयार झाली आहेत.

Updated: Sep 25, 2022, 10:02 PM IST
राणी एलिझाबेथ पेक्षा शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा खर्च, आकडा ऐकून धक्काच बसेल title=
Shinzo Abe funeral in controversy

Shinzo Abe state funeral budget : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारात प्रचंड खर्च झाल्याबद्दल देशात बरीच टीका होत आहे. जपान सरकार माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावर राणी एलिझाबेथच्या अंत्यसंस्कारापेक्षा खूप जास्त खर्च करत आहे. हा खर्च टोकियो ऑलिम्पिकमध्ये झालेल्या खर्चापेक्षा जास्त आहे. शिंजो आबे यांची जुलैमध्ये हत्या झाली होती. शिंजो आबे यांच्या पार्थिवावर पुढील आठवड्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. जगातील अनेक राष्ट्रप्रमुख यात सहभागी होणार आहेत.

शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी किती खर्च येणार आहे?

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पार्थिवावर पुढील आठवड्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपान सरकार शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे 1.66 अब्ज येन खर्च करणार आहे. ही रक्कम ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारावर खर्च करण्यात आलेल्या खर्चापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, राणी एलिझाबेथ II च्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे 1.3 अब्ज येन खर्च आला.

ऑलिम्पिक बजेटपेक्षा दुप्पट खर्च होणार?

शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी निधी देण्यावरून जपानमध्ये बराच वाद सुरू आहे. त्याविरोधात निदर्शनेही झाली. या घटनेला अनेकांचा विरोध आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, एका व्यक्तीने राज्याच्या खर्चाचा निषेध करण्यासाठी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या कार्यालयासमोर शरीराला आग लावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जपानने टोकियो ऑलिम्पिकवर 13 अब्ज डॉलर खर्च केल्याचे लोक म्हणतात. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारावर खर्च करण्यात येणारा अंदाजित बजेट जवळपास दुप्पट आहे.

बजेट वाढण्याची शक्यता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपान सरकारने माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी 250 दशलक्ष येनचे अंदाजे बजेट ठेवले आहे. मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांच्या मते या कार्यक्रमात पोलिसांवर 800 दशलक्ष येन खर्च केले जाणार आहेत. त्याच वेळी, मान्यवरांच्या मेजवानीसाठी 600 दशलक्ष येन खर्च करणे अपेक्षित आहे. आबे यांच्या अंत्यसंस्काराचे आयोजन करण्याचे कंत्राट टोकियोस्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मुरायमाला देण्यात आले आहे. माजी पंतप्रधान आबे यांच्या अंत्यसंस्काराचे बिल 1.7 अब्ज येनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.