Bermuda Triangle चे खतरनाक रहस्य काय? या परिसराचं गुढ वैज्ञानिकांनी उलगडलं

Bermuda Triangle चे  रहस्य नेमके काय आहे? याबाबत नेहमीच चर्चा होत असते. 

Updated: Mar 31, 2021, 01:07 PM IST
Bermuda Triangle चे खतरनाक रहस्य काय? या परिसराचं गुढ वैज्ञानिकांनी उलगडलं title=

 Bermuda Triangle चे  रहस्य नेमके काय आहे? याबाबत नेहमीच चर्चा होत असते. Bermuda Triangle वर उठणाऱ्या 100 फुट उंच खतरनाक लहरीं आणि समुद्री जहाज रहस्यमयरित्या गायब होण्याचं कारण वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे.

Bermuda Triangle चे रहस्य

फ्लोरिडा, बर्मुडा आणि प्यूटो रिकाच्या दरम्यान असलेल्या Bermuda Triangle वरून जाणारे समुद्री जहाज आणि विमान अचानक गायब होत असल्याच्या घटना अनेकवेळा झाल्या आहेत. जगात ह्या परिसरातचे रहस्य उलगडण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करीत होते.
 Bermuda Triangle च्या खतरनाक परिसरातून जाणाऱ्या जहाज आणि विमानांना वेगळ्याच भयावह वातावरणातून जावं लागतं. या परिसरात आल्यानंतर खराब वातावरणामुळे जहाज बुडतात तर, विमानेही आपली दिशा भरकटून बुडतात अशी प्रकरणे घडली आहेत. 
 
अशी कोणती भौगोलिक कारणे आहेत. की ज्यामुळे या परिसरात जाणारी विमाने आणि जहाजं समुद्री चक्रीवादळाच्या गर्तेत अडकून बुडतात. याचा शोध जगभरातील शास्त्रज्ञ घेत होते. अनेक दशकांपासून वैज्ञानिक हे गुढ उकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
 
 ख्रिस्तोफर कोलंबस यांच्यापासून ते आताच्या नवोदित वैज्ञांनिकापर्यंत या रहस्याविषयी अनेकांनी लिहलं आहे.
 
 या परिसरातील समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे तेथील पाण्याचे घनत्व कमी होते. त्यामुळे मोठी जहाज बुडतात. तसेच या समुद्रात अनेक छोटीमोठी बेटं आहेत. ज्याची टक्कर होऊनही जहाजं बुडू शकतात. अशी माहिती समोर आली आहे.

आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोनार आणि रडारमुळे जहाजांना पाण्याखालील बेटांचा अंदाज येतो. त्यामुळे अपघात कमी होता.  

तसेच या परिसरात वाऱ्याचा वेग जास्त असतो. ढगांची दाटी अधिक असते म्हणून विमानेही भरकटतात. अशा वातावरणात त्यांचा अपघात होण्याची शक्यता असते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जहाजं आणि विमानांच्या अपघाताची शक्यता कमी झाली आहे. 

Bermuda Triangle परिसरात जहाजं आणि विमानं गायब होण्याच्या रहस्याबाबत अनेक दशकांपासून अभ्यास सुरू आहे. परंतु यामागे भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत हे नक्की.