रियाद : मुस्लिमांच्या कट्टर देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियात योगाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता या देशात कोणत्याही आडकाठीशिवाय योगसाधना केली जाईल, असा दावा अरब योगा फाऊंडेशनचे नौउफ मारवाई यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून केला.
१२ नोव्हेंबरला नौउफ यांनी पोस्ट केले की, "योग या शब्दाचा अर्थ आहे 'जोडणे. योगसाधनेमुळे व्यक्तीचे मन, शरीर, भावना आणि आत्मा एकत्रिपणे विश्वाशी जोडल्या जातात. आता योग अरबच्या समुद्र किनाऱ्यावर आला आहे. त्याने सर्व कट्टर सीमा पार केल्या आहेत."
मात्र नौउफ यांचे हे अकाऊंट व्हेरीफाईड नसल्यामुळे हा दावा कितपत खरा आहे, याबद्दल साशंकता आहे.
२१ जुनला जगभरात योग दिवस साजरा केला जातो. भारतात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.