युक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे.

Updated: Feb 26, 2022, 12:00 PM IST
युक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार title=

कीव : Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे, अशी माहिती झेलेन्स्कींच्या प्रवक्त्याने दिली. दरम्यान, रशियांना एक मोठी अट घातली आहे. त्यामुळे आता युक्रेन पुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे आज हे युद्ध संपणार की आणखी चिघळणार यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. युक्रेन आणि रशिया युद्धात युक्रेनने आता नरमाईची भूमिका घेतलीय. रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या चर्चेसाठी जागा आणि वेळ ठरवण्यात येत आहे, असे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

EU agrees to freeze assets linked to Putin, Pope visits Russian embassy in Rome: Russia-Ukraine war - 10 points

युक्रेन शांतता आणि युद्धविरामावर चर्चेसाठी तयार असल्याचं युक्रेनने म्हटले आहे. कोणत्याही संघटनेत सहभागी होणार नाही, तसेच सुरक्षेची हमी या विषयांवर युक्रेन चर्चा करेल, असे प्रवक्त्यांने म्हटले. दरम्यान युक्रेनने युद्ध संपवण्यासाठी पुन्हा एकदा भारताला साद घातली आहे. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताचे संरक्षणमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. रशियाशी मैत्री असल्याने भारताने युद्धविराम करण्यासाठी रशियाला तयार करावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे.